PM मोदींचे 2 तास 12 मिनिटे भाषण, 98 वेळा टाळ्या, 22 वेळा हशा

PM Narendra Modi : मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार ( Manipur Violence) उफाळला आहे. याच मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तराच्या भाषणात मोदींनी विरोधकांवर ताशेरे ओढले. यावेळी पीएम मोदींनी तब्बल 2 तास 12 मिनिटे भाषण करून […]

Untitled Design (7)

PM MODI

PM Narendra Modi : मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार ( Manipur Violence) उफाळला आहे. याच मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तराच्या भाषणात मोदींनी विरोधकांवर ताशेरे ओढले. यावेळी पीएम मोदींनी तब्बल 2 तास 12 मिनिटे भाषण करून सर्वचं रेकॉर्ड मोडले. (Prime Minister Narendra Modi on motion of no confidence)

विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी 5 वाजून 8 मिनिटांनी भाषणाला सुरुवात केली. मोदी म्हणाले, मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने गांधी हे नाव चोरलं. काँग्रेसने इतरांची चिन्हे आणि विचार चोरले. तिरंगा चोरण्याचे काम काँग्रेसने केले, त्यांचे स्वत:चे काही नाही. केवळ चष्मा बदलून विकासाचे चित्र दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव बदलले आहे. त्यांनी आघाडीचे नाव इंडिया आघाडी असे ठेवले आहे. पण, ही इंडिया आघाडी नसून अहंकारी आघाडी आहे. तिथल्या प्रत्येकाला आता नवरदेव व्हायचं आहे. प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचं,असा टोलाही त्यांनी लगावला.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं… 

मोदी मणिपूरधील हिंसाचारावर ठोस काहीतरी बोलतील, हे विरोधी पक्षांची अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली. ते केवळ विरोधकांवर बोलत होते. त्यामुळं विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला. पंतप्रधानांच्या भाषणानंतर सुमारे दीड तासांनी विरोधकांनी 6.40 वाजता सभागृहातून सभात्याग केला. विरोधकांनी सभागृहातून बाहेर पडताच पीएम मोदींनी मणिपूरवर बोलण्यास सुरुवात केली.

पंतप्रधानांचे भाषण 2 तास 12 मिनिटे चालले. पंतप्रधानांच्या भाषणात मणिपूर शब्दाचा 29 वेळा उल्लेख करण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान 98 वेळा टाळ्या वाजल्या. त्याचवेळी भाषणादरम्यान असे 22 प्रसंग आले की सभागृहात हशा पिकला.

याआधी बुधवारी अमित शाह यांनी सभागृहात सर्वाधिक वेळ बोलण्याचा विक्रम केला होता. शाह यांनी 2 तास 13 मिनिटे प्रदीर्घ भाषण देऊन 58 वर्ष जुना विक्रम मोडला. शाह यांनी काल सरकारची कामगिरीवर भाष्य केले होते. मात्र, त्यांचा हा विक्रम अवघ्या एक दिवसच अबाधित राहिला. अमित शाह यांच्या आधी 1965 मध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान 2 तास 12 मिनिटे भाषण केले होते.

 

Exit mobile version