मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं…

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं…

Eknath Shinde : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांसह अनेक आमदार शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यांना मंत्रिपदंही मिळाली आणि त्यांना खातेवाटपंही झालं. मात्र, अद्याप शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदे मिळाली नाहीत. मंत्रीपदाची माळ कधी गळ्यात पडते, याच्या प्रतिक्षेत शिंदे गटातील आमदार आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं बोलल्या जायचं. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं सांगितलं. (Eknath Shinde on Cabinet expansion in satara tour)

मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसीय सातारा दौऱ्यावर आहेत. दरे (महाबळेश्वर) येथे जाण्यापूर्वी ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारलं असता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्याची तारख देखील लवकरच ठरवू, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळसदृश परिस्थिती असून पेरण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांना असेच सोडणार नाही. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याची केंद्राची योजना आहे. शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये वाढीव सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

parliament session : अविश्वास प्रस्तावात ‘इंडिया’ हारली अन् ‘एनडीए’ जिंकली! मतदानाआधीच सभात्याग 

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मुंबई-गोवा रस्त्याबाबत मी स्वत: बैठक घेतली होती. महामार्गाच्या कामावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही गणपतीच्या आधी एक लेन उघडणार आहोत. मुंबई सिंधुदुर्ग महामार्ग मुंबई गोव्यासारखा बनवणार आहोत. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांवर हल्ले होऊ नयेत. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पत्रकारांबद्दल आणखी काय करता येईल याबाबत लक्ष घालते जाईल.

साताऱ्यातील पर्यटनाच्या विकासासाठी पर्यावरण पूरक पर्यटन विकसित करून रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले जाणार आहे.
महाबळेश्वर, कास येथे कोणतेही बेकायदा अनधिकृत बांधकाम होऊ नये, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube