Farmer Viral Vidio PM Modi Kiss : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि रणधुमाळी सुरू झाली आहे. आता राजकीय पक्षांनी आपला प्रचार देखील जोरदारपणे सुरू केला आहे. यातच आता एका शेतकऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक शेतकऱ्याने सरकारने आरोग्यासाठी पाच लाख रुपये जाहीर केले आहेत. याबद्दल एका बसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा मुका घेऊन धन्यवाद म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मोहनदास कामत या युजरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी बुधवारी (दि. २९) रोजी निवडणूक जाहीर केली.
ಬಸ್ ಮೇಲಿನ ಮೋದಿ ಫೋಟೋಗೆ ಮುತ್ತಿಟ್ಟ ರೈತ ಹೇಳಿದ್ದೇನು ಗೊತ್ತಾ? #Karnataka #Farmer #NarendraModi
https://t.co/W3lM3Nxz1X— vijaykarnataka (@Vijaykarnataka) March 29, 2023
येत्या १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. येत्या २४ मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाल संपत आहे. त्यामुळे आता राजकीय रणधुमाळी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Rahul Gandhi यांच्यानंतर आणखी एकाचं पद जाणार?; ‘डार्लिंग’ विधानावरून नवा वाद… – Letsupp
कर्नाटक येथील एक ज्येष्ठ नागरिक पंतप्रधान मोदी यांच्या फोटोचा मुका घेत आहे. त्यावेळी तो म्हणतोय की, मला पूर्वी एक हजार रुपये मिळत होते. पंतप्रधान मोदी यांनी आता ५०० रुपये वाढवले आहेत. तुम्ही यापूर्वीआम्हाला उपचारासाठी पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही जग जिंकाल.
(244) Ajit Pawar LIVE | ABP Majha Live | Marathi News today | Maharashtra – YouTube