भारतामधील 80 टक्के लोक मांसाहारी, हे जेवणही चविष्ट असते; राहुल गांधींचा सरकारला टोला

Rahul Gandhi: भारतीय मांसाहारी जेवण चविष्ट असते. माझ्या बहिणीने बनवलेले छोले-भटुरेदेखील चविष्ट असतात.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rahul Gandhi

Rahul Gandhi On Brics Summit food menu : दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद (Brics Summit) दिमाखात पार पडली. ब्रिक्स राष्ट्रांच्या प्रमुखांना खास भारतीय शाकाहारी व्यंजन चाखण्यास मिळाले आहे. रात्रीच्या भोजनात केवळ शाकाहारी पदार्थांचा समावेश होता. पण त्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारला टोला लगावला आहे. भारतामधील 80 टक्के लोक मांसाहारी आहेत. भारतीय मांसाहारी जेवण चविष्ट असते,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, त्यांनी या पोस्टसोबत छोले-भटुरे यांचा फोटोही शेअर केला आहे. 80 टक्के भारतीय मांसाहारी आहेत. भारतीय मांसाहारी जेवण चविष्ट असते. माझ्या बहिणीने बनवलेले छोले-भटुरेदेखील चविष्ट असतात, असे राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसाठी शनिवारी भारत मंडपम् येथे रात्रीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या भोजनाच्या मेन्यूमध्ये केवळ शाकाहारी पदार्थांचा समावेश असल्याने त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.


नागरी कायदा लागू करण्याबद्दल हालचाली वाढल्या; गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा

खाण्यावरही राजकारण करत आहे काँग्रेस: किरेन रिजिजूंचा निशाणा
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेसकडून आता BRICS देशांच्या नेत्यांना वाढण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या मेन्यूवरही राजकारण केले जात असल्याचा आरोप रिजिजू यांनी केला. BRICS देशांच्या नेत्यांनी भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेतला. भारताच्या विविध भागांतील खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहेत, असे किरेन रिजिजू यांनी म्हटले.


ब्रिक्सच्या जेवणामध्ये काय होते मेन्यू?

ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रात्रीच्या भोजनात भारतीय खाद्यसंस्कृतीतील विविध शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. जेवणाच्या सुरुवातीला (स्टार्टर) ‘खंडवी मिले’ आणि ‘खुंब गलौटी’ हे पदार्थ देण्यात आले. खंडवी मिले हा वाफवलेल्या बेसनाच्या रोलचा पदार्थ आहेत. त्यावर मोहरी, नारळाचे तेल आणि कढीपत्त्याची फोडणी देण्यात आली होती.

मुख्य भोजन
मुख्य भोजनामध्ये पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक, कॅरट बीन पोरियाल, थक्कली बेले सारू, बाजरा पुलाव, चुकंदर रायता आणि विविध प्रकारच्या भारतीय रोट्यांचा समावेश होता. पनीर लबाबदारमध्ये मऊ पनीर, कांदा आणि टोमॅटोची घट्ट ग्रेव्ही होती. गुच्छी मार्मिकमध्ये हिमालयीन मोरेल मशरूम आणि शतावरीसोबत केशर, मनुका आणि मामरा बदामाचा वापर करण्यात आला होता. कॅरट बीन पोरियालमध्ये गाजर, हिरव्या बीन्स आणि दक्षिण भारतीय मसाल्यांसोबत नारळाचे तेल व ताज्या नारळाचा वापर करण्यात आला होता. थक्कली बेले सारू हा टोमॅटो, कढीपत्ता आणि तूर डाळीपासून तयार केलेला हलका शोरबा होता. बाजरा पुलावामध्ये बासमती तांदूळ आणि बाजरीचा वापर करण्यात आला होता. तर चुकंदर रायत्यामध्ये बीट आणि ताज्या वनस्पतींसह थंड दही देण्यात आले.

कोल्हापूरमधून सुरू झालेल्या एसएस रिटेल्सचा आता आयपीओ; पाचशे कोटी रुपये उभारणार


गोडमध्ये काय ?

डेझर्टमध्ये पुरानी दिल्ली फ्रूट क्रीम विथ जलेबी आणि शहतूत फिरनी यांचा समावेश होता. पुरानी दिल्ली फ्रूट क्रीम विथ जलेबीमध्ये हंगामी फळे, हलकी फेटलेली क्रीम आणि कुरकुरीत गोड जलेबीचा समावेश होता. तर शहतूत फिरनी ही दूध आणि तांदळापासून मंद आचेवर तयार करण्यात आली होती. त्यावर शहतूत आणि सोन्याच्या पानाने सजावट करण्यात आली होती.

follow us