Priyanka Gandhi : काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (दि. ११) रोजी केरळमधील वायनाड येथे रॅलीत भाजपवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, माझे स्वतःचे कुटुंब असून नवरा, मुलं आहेत. पण, माझ्या भावाला बायको नाही, मुलं नाही. काल राहुलच्या घरातील फर्निचर पॅक करताना मला वाटले की काही वर्षांपूर्वी मलाही माझ्या घरी जावे लागेल.मला मदत करण्यासाठी माझी मुले, माझे पती होते.माझे स्वतःचे कुटुंब होते.पण माझ्या भावाकडे त्याची मुलं, बायको, मदत करायला कुटुंब नाही, जरी आम्ही त्याच्यासोबत असलो तरी.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, “जेव्हा मी २०१९ मध्ये वायनाडला आले. तेव्हा मी तुम्हाला माझ्या भावाबद्दल खूप काही सांगितले होते. आज मला विश्वास आहे की वायनाडच्या लोकांना राहुल गांधी कोण आहेत हे माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे की तो एक प्रामाणिक आणि धाडसी माणूस आहे. जे त्याला गप्प करू इच्छितात त्यांना राहुल अजिबात घाबरत नाही.
भाजपला वाटते ते माझ्या घरी पोलिस पाठवून मला घाबरवतील पण… ‘राहुल गांधींची भाजपवर टीका – Letsupp
खासदार हा फक्त एक टॅग आहे. भाजप तो टॅग काढू शकतो. ते कार्यालय, घर घेऊ शकतात आणि मला तुरुंगातही टाकू शकतात, पण ते मला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाहीत. अदानीसोबतचे संबंध स्पष्ट करण्यासाठी मी पंतप्रधान मोदींना संसदेत अदानीबद्दल प्रश्न विचारला. सरकारच संसदेचे कामकाज चालू देत नसल्याचे तुम्ही प्रथमच पाहिले. काहीही झाले तरी मी थांबणार नाही, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी भाजपवर केला.