Download App

पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवरच का गेले ? थेट पुरावा दाखवत पाकची पोलखोल

Punjab’s Adampur Air base: रत -पाकिस्तान सीमेवर अनेक लष्करी तळ आहेत. परंतु ते आदमपूर एअरबेसवर का गेले, त्याला वेगळे कारणे आहेत.

  • Written By: Last Updated:

Punjab’s Adampur Air base: ऑपरेशन सिंदूरद्वारे (Operation Sindoor) पाकिस्तानला मोठा धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी सकाळीच आदमपूर एअरबेसवर (Adampur air base) पोहोचले. भारत -पाकिस्तान सीमेवर अनेक लष्करी तळ आहेत. परंतु ते आदमपूर एअरबेसवर का गेले, त्याला वेगळे कारणे आहेत. ते जाणून घेऊया

आदमपूर एअरबेस हे पंजाबमध्ये आहे. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एअरबेस आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूर एअरबेस चर्चेत आले होते. पाकिस्तानकडून या एअरबेसवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय हवाई दलाच्या जवानांनी हा हल्ला निकामी केला. पाकिस्तानकडून 10 मे रोजी ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे या एअरबेसवर हल्ला झाला होता. परंतु तो परतवून लावत भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवर हल्ले करत दहशतवादाचा खात्मा केला.


पाकिस्तान कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला १४ कोटी रुपये देण्याच्या तयारीत, काय आहे विषय?

पाकने 10 मे रोजी एक खोटा दावा केला होता. पाकच्या लढाऊ विमान JF 17 जेट्सने आदमपूर एअरबेसवरील मिसाइल डिफेन्स सिस्टम S-400 नष्ट केल्याचा पाकचा दावा होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एअरबेसवर जावून हा एअरबेस सुरक्षित आहे. तेथे सर्वकाही सुरळीत असल्याचे दाखवून दिले आहे.


ब्रेकिंग : युद्धबंदीनंतर भारतीय सैन्याला मोठं यश; जम्मूत चकमकीत लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

ड्रोनद्वारे आदमपूर येथील रडार सिस्टमचे नुकसान केल्याचा दावा पाकचा होता. त्याचे बनावट फोटोही पाकने जगाला दाखविले होते. परंतु रडार सिस्टिम सक्रीय असून, त्याचे नुकसान झालेले नाही. क्षेपणास्त्राने भारताच्या वायुसेनेचे विमान उद्ध्वस्त केले आहे, अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याचा खोटा दावा पाक लष्कराने केला होता. परंतु भारताच्या कोणत्या विमानाने नुकसान झालेले नाही. तसेच वैमानिक आणि जवानही सुरक्षित आहे. हा एअरबेस आता बंद पडलेला, असा दावा पाकचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे पाकचे या एअरबेसबाबतचे सर्व दावे खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

follow us