भाजपच्या ट्विटनंतर राघव चड्डांचा पलटवार! म्हणाले, रामचन्द्र कह गए सिया से…

संसदेतल्या व्हायरल फोटोप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या व्हायरल फोटोवरुन ट्विट करीत त्यांनी एका म्हणीचा कॅप्शनमध्ये उल्लेख करीत सडकून टीका केलीयं. संसदमधील कावळ्याने चोच मारल्याचा फोटो दिल्ली भाजपकडून शेअर करण्यात आला होता. या पोस्टमध्ये भाजपने राघव चड्डा यांच्यावर टीका केली. त्याचं प्रत्युत्तरच चड्डा यांनी दिलं […]

Raghav Chadda News

Raghav Chadda News

संसदेतल्या व्हायरल फोटोप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांवर निशाणा साधला आहे. या व्हायरल फोटोवरुन ट्विट करीत त्यांनी एका म्हणीचा कॅप्शनमध्ये उल्लेख करीत सडकून टीका केलीयं. संसदमधील कावळ्याने चोच मारल्याचा फोटो दिल्ली भाजपकडून शेअर करण्यात आला होता. या पोस्टमध्ये भाजपने राघव चड्डा यांच्यावर टीका केली. त्याचं प्रत्युत्तरच चड्डा यांनी दिलं आहे.

फोटोमध्ये काय होतं?
संसदेच्या दोन्ही सभागृहाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आहे. अशातच खासदार राघव चड्डा संसद भवनाच्या बाहेर येत होते. त्यावेळी ते फोनवर बोलत होते. याचदरम्यान एका कावळ्याने त्यांना चोच मारण्याचा प्रयत्न केल्याचं फोटोमध्ये दिसून येत आहे. कावळ्याने चोच मारल्यानंतर राघव यांनी आपला बचाव केला होता. याचदरम्यान चड्डा यांचा फोटो क्लिक करण्यात आला आहे.

या घटनेनंतर भाजपने ट्विटरद्वारे हा फोटो शेअर करीत चड्डा यांच्यावर निशाणा साधला होता. “झूठ बोले कौवा काटे…आज तक सिर्फ सुना था, आज देख भी लिया कौवे ने झूठे को काटा…असं कॅप्शन देत चड्डा यांना भाजपने डिवचलं होतं. त्यानंतर राघव चड्डा यांनीही फोटोवरुन भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे.

सोमय्यांचा पाय खोलात! तो व्हायरल व्हिडिओ खरा, गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती

या टीकेनंतर खासदार चड्डा यांनीही हाच फोटो रिट्विट करीत “रामचन्द्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना दुनका और कौवा मोती खाएगा” आज तक सिर्फ़ सुना था, आज देख भी लिया… या म्हणीचा उल्लेख करत चड्डा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

या ट्विटरवॉरनंतर भाजप-आपमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं आहे. भाजपच्या ट्विटनंतर दोन तासांतच राघव चड्डा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांचं ट्विट आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं असून 7.8 लाख हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईकही केलं आहे. तसेच अनेकांनी रिट्विटही केलं आहे.

Exit mobile version