ब्रेकिंग : अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधींची निर्दोष सुटका; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi निकालाच्या वेळी राहुल गांधी न्यायालयात उपस्थित होते.  हा खटला २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या एका वक्तव्याशी संबंधित होता. 

Rahul Gandhi

Rahul Gandhi

Rahul Gandhi acquitted by UP court in 2018 Amit Shah defamation case : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार/आमदार न्यायालयाने, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यातून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शुभम वर्मा यांच्या न्यायालयाने आज हा निकाल दिला. राहुल गांधी यांचे वक्तव्य मानहानीकारक स्वरूपाचे नव्हते असे न्यायालयाने म्हटले आहे. निकालाच्या वेळी राहुल गांधी न्यायालयात उपस्थित होते.  हा खटला त्यांनी 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या एका वक्तव्याशी संबंधित होता. 

 

नेमकं प्रकरण काय होतं?

या प्रकरणाची सुरुवात मे 2018 मध्ये झाली होती, जेव्हा राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना बंगळूरुमध्ये भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याबद्दल एक टिप्पणी केली होती. भारतातील लोक हे विसरतात की, भाजपचे अध्यक्ष एका खुनाचे आरोपी आहेत. हेच सत्य आहे असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. ही टिप्पणी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणाशी संबंधित होती. या प्रकरणात 2014 मध्ये मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अमित शाह यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली होती. शहा यांच्यावरील विधानानंतर स्थानिक भाजप नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधींच्या वक्तव्यासंदर्भात सुलतानपूर न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली होती.

मल्लिकार्जुन खर्गेंच्या ‘मोदी का बाप भी जायेगा’ वक्तव्यावरून वाद पेटला, भाजप आक्रमक, देशव्यापी आंदोलनाची घोषणा

आठ वर्षे चालली कायदेशीर लढाई

सुलतानपूर खासदार-आमदार न्यायालयाने राहुल गांधी यांना 27 नोव्हेंबर 2023 रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयात हजर झाल्यानंतर राहु गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. जुलै 2024 मध्ये, राहुल गांधी यांनी आपला जबाब नोंदवत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत आपल्याविरोधातील तक्रार राजकीय द्वेषबुद्धीने प्रेरित असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. सुनावणीदरम्यान, तक्रारदाराने साक्षीदार आणि पुरावे सादर केले होते. तसेच तक्रारदाराने राहुल गांधींच्या कथित आवाजाचा नमुना रेकॉर्डिंगशी जुळवून पाहण्याची विनंती देखील केली होती, परंतु सत्र न्यायालयाने ही विनंती फेटाळली.

या आदेशाला आव्हान देणाऱ्या त्यानंतरच्या याचिका कनिष्ठ न्यायालयात आणि उच्च न्यायालयात अयशस्वी ठरल्यानंतर आणि दोन्ही पक्षांचा अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर, न्यायालयाने आज (दि.26) ऑक्टोबर रोजी निकाल देण्याचे निश्चित केले होते. अखेर उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार/आमदार न्यायालयाने, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यातून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, तक्रारदाराला आता उच्च न्यायालयात अपील करण्याची संधी असून पुढे नेमकं काय होतं हे पाहणंं महत्त्वाचे ठरणार आहे. 

Exit mobile version