Download App

‘सनातन’च्या वादात पडू नका’; BJP चा प्लॅन लक्षात येताच राहुल गांधींचा नेत्यांना अलर्ट

Rahul Gandhi : तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. स्टॅलिन यांनी हे वक्तव्य करून भाजपला आक्रमक होण्याची आयतीच संधी दिली आहे. मग काय भाजपनेही (BJP) हा मुद्दा हातोहात उचलत इंडिया आघाडीसह काँग्रेसवर (Congress) जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली. स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून इंडिया आघाडी काहीशी बॅकफूटवर गेल्याचे दिसत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही आपल्या नेत्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. पक्षातील नेत्यांनी सनातन धर्माबाबत (Sanatan Dharma Row) सुरू असलेल्या वादात पडू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

‘सनातन’साठी PM Modi मैदानात! इंडिया आघाडीवर हल्लाबोल

काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक हैदराबाद येथे झाली. या बैठकीत सनातन धर्माबाबत देशभरात सुरू असलेल्या वादावरही चर्चा करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या काही नेत्यांनी सावधगिरी बाळगावी. भाजपाच्या जाळ्यात अडकू नये असे आवाहन केले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह काही नेत्यांनी या बैठकीत पक्षाने अशा वादांपासून दूर राहान त्यात अडकू नये असे सांगितले.

राहुल गांधी यांनी आपल्या नेत्यांना सनातनच्या वादात अडकू नका. त्याऐवजी गरीब कल्याण आणि त्यांच्या समस्यांवर जास्त लक्ष केंद्रीत करा असे सांगितल्याचे समजते. सनातन धर्माच्या वादावर बोलल्याने पक्षाचे नुकसान होईल असे मत भूपेश बघेल आणि दिग्विजय सिंह यांनी या बैठकीत व्यक्त केले. काँग्रेसने सनातन धर्माच्या वादात पडू नये. द्रमुकने म्हटले आहे की ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत. तर जातीय दडपशाहीच्या विरोधा आहेत. जातिव्यवस्थेच्या विरोधात आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली.

भाजपची लाट नाही, त्सुनामी येणार! राजस्थानात भरपावसात फडणवीसांची जोरदार बॅटिंग

सनातनसाठी पीएम मोदी मैदानात

दरम्यान, याआधी दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना पीएम मोदी (PM Modi) यांनी याच मुद्द्यावर इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली होती. इंडी आणि घमंडिया आघाडीचे लोक हे त्या सनातन पंरपरेला (Sanatan Dharma Row) नष्ट करण्याच्या गोष्टी करत आहेत ज्या सनातनपासून प्रेरणा घेत स्वामी विवेकानंदांनी समाजातील वाईट चालीरितींबाबत लोकांना जागृत केले. पण, हे इंडी आघाडीचे लोक त्याच सनातनला नष्ट करण्याच्या बाता मारत आहेत. ही सनातनचीच ताकद होती की स्वातंत्र्यपूर्व काळात फाशीची शिक्षा होणारे स्वातंत्र्यसैनिक सुद्धा पुन्हा भारतातच जन्म मिळावा असे म्हणायचे. ज्या सनातन धर्माने हजारो वर्षांपासून भारताला एकसंघ ठेवले आज त्याच सनातनला विखंडीत करण्याची या लोकांची इच्छा आहे, असे मोदी म्हणाले होते.

Tags

follow us