Download App

नितीश कुमार अन् BJPने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं; राहुल गांधींचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : पाटण्यात युवा काँग्रेसने (Youth Congress) महारोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो तरुण-तरुणी हजेरी लावली. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बिहार सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारने बिहारला (Bihar) बेरोजगारीच्या आगीत झोकून दिलं आहे,अशी टीका त्यांनी केलं.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया काय? 

तसेच लाखो तरुणांना रोजगाराच्या शोधासाठी बाहेरच्या राज्यात जावं लागतं. या तरूणांना आपलं गाव, आपला परिवार सगळं मागे सोडावं लागतं, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी बिहारमधील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नितीश कुमार आणि भाजपच्या डबल इंजिन सरकारवर तीव्र टीका केली आहे. 20 जुलै 2025 रोजी पाटण्यात युवा काँग्रेसने आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. याचा व्हिडिओ X अकाऊंटवर शेअर करत राहुल गांधींनी लिहिलं की, महारोजगार मेळ्यातील ही गर्दी फक्त गर्दी नाही, तर बिहारचा तरुण आता भाषणांवर नाही, तर रोजगारावर आपले भविष्य घडवू इच्छितो, हा स्पष्ट संदेश आहे. भाजप आणि नितीश सरकारने बिहारला बेरोजगारीच्या आगीत झोकून दिले आहे, त्यामुळं लाखो तरुणांना रोजीरोटीसाठी स्थलांतर करावे लागत आहे, बाहेरच्या राज्यात जावं लागतं. या तरूणांना आपलं गाव, आपला परिवार सगळं मागे सोडावं लागतं. असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंही एकत्र येऊ शकतात, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचं विधान 

पुढं बोलताना राहुल गांधी म्हणाले, बिहारचा तरुण आता केवळ भाषणांवर नाही, तर रोजगारावर आपले भविष्य घडवू इच्छितो. इथला तरुण तरुण मेहनती, कष्टकरी आणि बुद्धिमान आहेत. त्यांना फक्त स्थानिक आणि सन्मानजनक रोजगाराची गरज आहे. आता बदलाची सुरूवात झाली आहे.

समृध्द बिहार घडवणार…
पुढं ते म्हणाले, नितीश सरकार 20 वर्षांच्या सत्तेनंतरही बिहारला सुरक्षा, सन्मान आणि विकास देऊ शकली नाही. मात्र, काँग्रेस आणि इंडिया आघाडी केवळ आश्वासने नव्हे तर उपाय घेऊन आली आहेत. आमचे स्पष्ट उद्दिष्ट आहे की, प्रत्येक युवकाला रोजगार देणं, त्याच्या कौशल्याला योग्य संधी देणं, स्थलांतर थांबवणं आणि प्रत्येक कुटुंबाला एकत्र ठेवणं. हाच मार्ग एका समृद्ध बिहारकडे जाण्याचा, असं राहुल गांधी म्हणाले.

 

follow us