Rahul Gandhi On BJP : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी प्रथमच केरळमधील वायनाड येथे पोहोचले.यावेळी आयोजित एका सभेत बोलताना गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाण साधला आहे. खासदार हे केवळ एक पद आहे म्हणून भाजप ते पद घेऊ शकतात, ते घर घेऊ शकतात आणि ते मला तुरुंगातही टाकू शकतात, परंतु ते मला वायनाडच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाहीत.
राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले, भाजपला वाटते की ते माझ्या घरी पोलिस पाठवून मला घाबरवतील, पण त्यांनी माझे घर घेतले याचा मला आनंद झाला. तुम्ही माझे घर 50 वेळा घ्या पण मला याची पर्वा नाही. त्यानंतरही मी देशाचे आणि वायनाडच्या जनतेचे प्रश्न मांडत राहीन.
राहुल गांधी म्हणाले, मी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुमचे अदानीशी नाते सांगण्यास सांगितले… मी विचारले तुमचे अदानीशी काय नाते आहे? मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला उत्तर दिले नाही. भाजपचे मंत्री संसदेत माझ्याबद्दल खोटे बोलले. मी स्पीकरकडेही गेलो, पण तरीही मला बोलू दिले नाही.
निळ्या साडीत हनी रोज खूपच सुंदर दिसतेयं
भाजपने मला संसदेतून अपात्र केले आहे, माझे घर घेतले आहे आणि 24 तास माझ्यावर हल्ले करत आहेत. मला माहित आहे की मी योग्य काम करत आहे आणि ते माझ्यावर कितीही हल्ले करतील, मी थांबणार नाही. या अपात्रतेमुळे वायनाडच्या लोकांशी माझे नाते अधिक घट्ट होईल.
आपल्याच सरकारविरोधात सचिन पायलट बसले उपोषणाला, मुख्यमंत्री ऑन टार्गेट
गौतम अदानी या एका माणसाला वाचवण्यासाठी संपूर्ण सरकार आपली लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रियांका गांधी यांनी केला. पंतप्रधान मोदींना गौतम अदानी यांचा बचाव करण्याची जबाबदारी वाटते पण त्यांना भारतातील लोकांप्रती कोणतीही जबाबदारी वाटत नाही.