Download App

तुम्हाला हे शोभत नाही; मोदींच्या भाषणात गोंधळ घालणाऱ्या राहुल गांधींना ओम बिर्लांनी खडसावले

PM Modi यांच्या भाषणात विरोधकांनी गोंधळ घातल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना चांगलेच खडसावले

Image Credit: Letsupp

Rahul Gandhi confusing in PM Modi Speech Om Bilrla scolded him : आज संसदेच्या विशेष अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. (Parliament Session ) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi) बोलले आहेत. त्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Bilrla) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चांगलेच खडसावले तर मोदी यांनी देखील विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

Big Breaking : उत्तर प्रदेशात भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी; 23 जणांचा मृत्यू

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, मी काही लोकांचे दुःख समजू शकतो. त्याने खोटं बोलून देखील त्यांचा पराभव झाला. त्याच वेळी विरोधकांचा गोंधळ वाढला. विरोधकांनी विविध मुद्द्यांसह मणिपूरच्या मुद्यावर घोषणाबाजी केली. त्यामुळे मोदी यांना बोलणे कठिण झाले. त्यांनी अखेर बाकावर बसून घेतले. तर त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना चांगलेच खडसावले. पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना उभं राहणं, गोंधळ घालणं हे सभागृहाच्या परंपरेला धरून नाही. तसेच एका विरोधी पक्षनेत्याला हे वागणं शोभत नाही. तुम्हाला देखील बोलायला पुरेसा वेळ दिलेला आहे. असं म्हणत बिर्ला यांनी राहुल गांधी यांना चांगलेच खडसावले

एकनाथ शिंदेंचा विधानसभेत राहुल गांधींना टोला; ‘आलू डालो…सोना निकालो’

त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे भाषण पूर्ण केले मोदी पुढे म्हणाले की, या देशाने कित्येक वर्ष तुष्टीकरणाचं राजकारण अनुभवलं आहे. मात्र आम्ही संतुष्टीकरणाचा विचार घेऊन आलो आहोत. 2014 पूर्वी देशातील लोकांनी जे काही मोठे नुकसान सहन केलं होतं. ते म्हणजे त्यांचा आत्मविश्वास हरवला होता. सर्वत्र रोज नवे आणि शेकडो कोटींच्या घोटाळ्यांच्या बातम्या बघायला मिळत होत्या. असं म्हणत मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देत विरोधकांना टोले लगावले आहेत.

follow us

वेब स्टोरीज