राहुल गांधींना शिक्षा… Sharad Pawar यांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता!

नवी दिल्ली : देशातील वातावरण अत्यंत चिंताजनक बनत चालले आहे. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याचे वारंवार दिसत आहे. आज गुजरातच्या न्यायालयाने ज्याप्रमाणे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात निकाल दिला आहे. तो पाहुन तर माझी चिंता आणखीनच वाढली आहे. राहुल गांधी यांना ज्याप्रमाणे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ती सरळसरळ व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे, अशा […]

Sharad Pawar

Sharad Pawar

नवी दिल्ली : देशातील वातावरण अत्यंत चिंताजनक बनत चालले आहे. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याचे वारंवार दिसत आहे. आज गुजरातच्या न्यायालयाने ज्याप्रमाणे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात निकाल दिला आहे. तो पाहुन तर माझी चिंता आणखीनच वाढली आहे. राहुल गांधी यांना ज्याप्रमाणे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ती सरळसरळ व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे, अशा तीव्र शब्दांत राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रतिक्रिया दिली.

केंद्र सरकार देशातील मूलभूत हक्क, भाषण स्वातंत्र्य आणि लोकशाही अभिव्यक्ती कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. याबाबत माझी तीव्र नाराजी मी नेहमी व्यक्त करत आलो आहे. आजही नाराजी नोंदवत आहे. आजचा न्यायालयाचा निकाल गंभीर चिंता वाढवणारा आहे, अशी तीव्र नाराजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

Chandrashekhar Bavankule : मोदींना चोर म्हणणाऱ्या गांधींना ‘ओबीसी’ माफ करणार नाही!

शरद पवार म्हणाले की, भारतातील राजकीय पक्ष, नेते आणि नागरिकांचा आवाज दाबण्याचा वारंवार होत असलेला प्रयत्न ही गंभीर चिंतेची बाब आहे. यंत्रणेकडून अथवा न्यायालयात कडून सातत्याने विरोधी पक्षाच्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे.

राहुल गांधी यांचा आजचा निकाल हा मुद्दा अधोरेखित करतो. राष्ट्रवादीचे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल यांचेही प्रकरण असेच आहे. मी आपल्या राजकीय परिदृश्यातील या नवीन प्रवृत्तीचा निषेध करतो, ज्याने आजच्या परिस्थितीत प्रत्येकाला चिंता करावी, असा आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Exit mobile version