Download App

Rahul Gandhi पुन्हा परदेशातून बरसले; म्हणाले, देशातील प्रश्नांवरील लक्ष हटवण्यासाठी इंडिया आणि भारतचा मुद्दा

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) बेल्जियम दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्यावेळी देखील राहुल गांधींना परदेशातून सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी देखील त्यांनी टीका आहे. यावेळी त्यांनी देशाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर बोलले आहेत.

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावाकडं का जातात? उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांत सांगितलं

काय म्हणाले राहुल गांधी?

कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी बेल्जियम दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी देशातील केंद्र सरकारवर टीका केली ते म्हणाले, मोदी सरकार सामान्य माणसांच्या प्रश्नांवर लक्ष देत नाही. त्यांच्या काही खास लोकांसाठी ते काम करतात. भारतात सतत वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे. देशात अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

‘सनातन धर्म मानणाारे कॉंग्रेस-राष्ट्रवादी राजकारणात अस्पृश्यता पाळतात; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

बेल्जियम दौऱ्यावर असताना राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना पत्रकारांनी देशाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारले त्यावेळी राहुल म्हणाले की, फक्त सरकारला हे देशाचं नाव बदलायचं आहे. लोकांना मूळ विषयांवरून भरकटवण्यासाठी हे सगळ केलं जात आहे. तर यावेळी रशिया युक्रेन मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारचं समर्थन केलं आहे. ते म्हणाले या बाबतीत पूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या सोबत आहे.

दरम्यान भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. अशातच आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यानेही तुर्कस्तान देशाचे उदाहरण देत वक्तव्य केले आहे.

follow us