Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) बिहारच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी दिली नसली तरी, तरीही राहुल गांधींनी तिथे पोहोचले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर (Modi government) जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.
तसेच त्यानंतर बिहार कॉंग्रेसने राहुल गांधींचा एक फोटो ट्वीट केला. त्याला कायर समझा था क्या ? फायर हूँ मैं, असं कॅप्शन दिलं.
कायर समझा था क्या ?
फायर हूँ मैं 🔥📍दरभंगा , अंबेडकर कल्याण छात्रावास pic.twitter.com/RzXScY9ZdL
— Bihar Congress (@INCBihar) May 15, 2025
राहुल गांधींना पोलिसांनी रोखलं..
राहुल गांधींचा गुरुवारी सकाळी ११.३० वाजता दरभंगा येथील आंबेडकर कल्याण वसतिगृहात शिक्षण न्याय संवाद कार्यक्रम होणार होता. मात्र, एक दिवस आधी जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी देण्यास नकार दिला होता. दरम्यान, परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी दरभंगा येथे आले. पोलिस प्रशासनाने त्यांना आंबेडकर वसतिगृहात जाण्यापासून रोखलं. त्यावेळी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्याने घोषणाबाजी केली.
महायुती पालिका निवडणुका एकत्र लढणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले…
अखेर राहुल गांधींनी केलं भाषण
अखेर राहुल गांधींना रोखण्यात पोलिस प्रशासन कमी पडले. ते कार्यक्रम स्थळी पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचे भाषण फक्त १२ मिनिटांत संपले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बिहार पोलिसांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते मला थांबवू शकले नाहीत. कारण तुम्हा सर्वांची शक्ती माझ्या मागे आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधणं, बोलणे कधीपासून गुन्हा ठरलंय? नितीशजी, तुम्हाला कशाची भीती वाटते? तुम्हाला बिहारमधील शिक्षण आणि सामाजिक न्यायाची स्थिती लपवायची आहे का?, असा सवाल राहुल गांधींनी केला.
LIVE: LoP Shri @RahulGandhi addresses the Shiksha Nyay Samvad | Darbhanga, Bihar. https://t.co/NGIA17Ub44
— Congress (@INCIndia) May 15, 2025
भारतातील ९० टक्के लोकसंख्येमध्ये अत्यंत मागासलेले, दलित आणि अल्पसंख्याक आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधात आहेत. पण शेवटी आपल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, असंही ते म्हणाले.
राहुल गांधींच्या या बिहार दौऱ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बिहार कॉंग्रेसने राहुल गांधींचा एक फोटो ट्वीट केला. कायर समजा था क्या? फायर हूँ मैं, असं कॅप्शनही या फोटोला देण्यात आलं. दरम्यान, राहुल गांधींचा हा फोटो जोरदार व्हायरल होतोय.