महायुती पालिका निवडणुका एकत्र लढणार? मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच म्हणाले…

Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. ते आज पुण्यात (Pune) माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला या निवडणुका महायुती म्हणून लढ्याच्या आहे. काही ठिकाणी अपवादात्मक असलं तर आमच्यामध्ये अंडरस्टँडिंगने काही ठिकाणी वेगळे लढू. निवडणुकीत एकमेकांवर टीका न करता जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र लढणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच आमच्यात अंडरस्टँडिंग आहे. वेगळे जरी लढलो तरी आम्ही “पोस्ट पोल” नंतर एकत्र येणारच असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
माध्यमांशी पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात युती सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आला पाहिजे, प्रशासकीय क्षमता वाढली पाहिजे म्हणून विविध अधिकारी यांची कार्यशाळा आणि संवाद करत आहोत असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच महापालिका आयुक्त, सी इ ओ यांची कार्यशाळा आज पार पडणार आहे. त्यांचे गट आम्ही तयार करतो आणि त्यांच्याशी 1 तास चर्चा करून त्यांच्या अडचणी आणि त्यांचे विचार याबाबत चर्चा करतो.
भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका; ट्रम्प तात्यांंनी पुन्हा फिरवलं ‘कार्ड’; टॉम कुक यांना दिला सल्ला
150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे हाच आमचा हेतू आहे. एक संस्था तयार झाली पाहिजे हाच आमचा उद्दिष्ट आहे. महानगरपालिका यांचे गट तयार होणार आहेत, ग्राउंड चे न्यान याचे संकलन करणे हा आमचा प्रयत्न आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.