Rahul Gandhi on RSS Mohan Bhagwat : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर निशाणा साधला. (RSS ) यावेळी बोलताना ते म्हणाले, राम मंदिर बांधल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले हे त्यांचे विधान देशद्रोहासारखे आहे. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही. हे भागवत यांचे विधान प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे. जर भागवत हे इतर कोणत्याही देशात बोलले असते तर त्यांना अटक झाली असती, असं मत राहुल गांधी आंनी व्यक्त केलं आहे. नवीन पक्ष मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मोहन भागवत हे दर 2-3 दिवसांनी स्वातंत्र्य चळवळ आणि संविधानाबद्दल त्यांचे मत व्यक्त करतात. त्यांनी काल जे म्हणलं तसं म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे. कारण ते म्हणाले होते की संविधान अवैध आहे, ब्रिटिशांविरुद्धचा लढा अवैध आहे. हे जाहीरपणे बोलण्याचं धाडस ते करतात. इतर कोणत्याही देशात, अशा प्रकारच्या विधानांसाठी त्यांना अटक केली जाईल आणि खटला चालवला जाईल, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
मोठी बातमी! सावरकर प्रकरणातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना जामीन
त्यांच्यात (भागवत) हे जाहीरपणे सांगण्याची हिंमत आहे, जर हे इतर कोणत्याही देशात घडले असते तर त्यांना अटक केली असती आणि त्यांच्यावर खटला दाखल केला असता. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले नाही असं म्हणणं म्हणजे प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. हे बोल ऐकणं थांबवण्याची वेळ आली आहे. कारण या लोकांना वाटते की ते फक्त पुनरावृत्ती करत आणि ओरडत राहू शकतात असंही ते म्हणाले आहेत.
याआधी, दोन दिवसांपूर्वी सोमवारी, सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करावी. कारण अनेक शतकांपासून शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देणाऱ्या देशाला खऱ्या स्वातंत्र्याची गरज होती. ते या दिवशी प्राप्त झाले. पक्षाच्या नवीन मुख्यालयात देशात दोन विचारसरणींमधील सुरू असलेल्या लढाईबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, येथे दोन विचारसरणींमधील लढाई सुरू आहे. एका बाजूला आपला विचार आहे, जो संविधानाचा विचार आहे. दुसऱ्या बाजूला संघाचा विचार आहे जो त्याच्या विरुद्ध आहे.