Video: राहुल गांधींनी केंद्र सरकारला महागाईवरुन घेरलं; बाजारात लसणाचा भाव विचारताच झाले अवाक
Rahul Gandhi on Garlic Prices : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी थेट भाजी मंडई गाठली. राहुल गांधींनी तेथील दुकानदारांना लसून, टोमॅटो आणि इतर भाज्यांचे दर विचारले. दुकानदाराने त्यांना सांगितलं की लसूण ४०० रुपये किलो आहे. या भाजीमंडईला दिलेल्या भेटीचा एक व्हिडीओ राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी शेअर केलेला आहे. त्याला पोस्ट करताना राहुल गांधी यांनी लिहीलंय की कधी ४० रुपयांना मिळणारा लसूण आता ४०० रुपयांचा झाला आहे. वाढत्या महागाईने सामान्यांचे बजेट कोलमडलं आहे आणि सरकार कुंभकर्णासारखं झोपलेले आहे असंही ते यावेळी म्हणालेत.
राहुल गांधींचा परभणी दौरा निव्वळ राजकीय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
राहुल गांधी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ दिल्ली येथील गिरीनगर समोरील हनुमान मंदिर भाजी मंडईचा आहेत. या व्हिडिओ महिला बोलताना दिसत आहेत की त्यांना राहुल गांधी यांना चहासाठी बोलावले आहे. म्हणजे त्यांना घरी येऊन पाहावे किती महागाई वाढलेली आहे.त्यामुळे गृहिणींचे बजेट गडबडलेले आहे. राहुल गांधींना महिला तक्रार करताना दिसत आहेत की पगार तर वाढलेला नाही. परंतु, वस्तूंचे दर वाढलेले असून ते कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत आणखी दरवढ होण्याची शक्यता असल्याचे त्या म्हणत आहेत.
४० – ५० रुपयां खाली नाही
व्हिडीओत महिलांना राहुल विचारत आहेत की आज काय खरेदी करत आहात? या प्रश्नावर एक महिला सांगते की ती थोडे टॉमेटो, आणि थोडा कांदा विकत घेऊ इच्छीत आहे म्हणजे वेळ निभावून नेला जाईल. एक महिला भाजीवाल्याला विचारताना दिसते की यंदा भाजी एवढी महाग का आहे.? काहीच स्वस्त होताना दिसत नाही. कोणतीही भाजी ३०-३५ रुपयांना मिळत नाही. सर्वांचे दर ४०-४५ रुपयांपेक्षा जादा आहे.
सोनं स्वस्त होईल पण लसूण नाही
राहुल गांधी यांनी जो व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यात भाजीवाला देखील बोलताना दिसत आहे की यंदा महागाई जास्त आहे. यापूर्वी एवढी महागाई कधीच नव्हती. राहुल गांधी भाजीवाल्याला विचारतात लसूण कितीला दिला ? यावर भाजीवाला लसणाची दर ४०० रुपये किलोवर आला आहे. एक महिला म्हणतेय की सोनं स्वस्त होईल पण लसूण नाही.
एक महिला या व्हिडीओत म्हणते की शलजमची भाजी ३०-४० रुपये किलो मिळायची तिचा भाव आता ६० रुपये किलो आहे.मटर १२० रुपये किलो मिळत आहे. राहुल गांधी महिलांना विचारताना दिसत आहेत की महागाई दरवर्षी वाढत आहे. तुमच्यावर देखील त्याचा भार वाढला असेल ना ? राहुल यावेळी म्हणाले की जीएसटीने महागाई वाढली आहे. यास महिलांना दुजोरा दिल्याचे दिसत आहे.
“लहसुन कभी ₹40 था, आज ₹400!”
बढ़ती महंगाई ने बिगाड़ा आम आदमी की रसोई का बजट – कुंभकरण की नींद सो रही सरकार! pic.twitter.com/U9RX7HEc8A
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 24, 2024