‘कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही’, राणेंचा राहुल गांधींवर निशाणा

  • Written By: Published:
‘कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही’, राणेंचा राहुल गांधींवर निशाणा

Narayan Rane : सोमनाथ सूर्यवंशींचा ( Somnath Suryawanshi) कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी निळा टी शर्ट परिधान केला होता. या निळ्या रंगाच्या कपड्यांवरून भाजपचे खासदार नारायण राणेंनी (Narayan Rane) राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

‘आम्ही त्यांना साथ देऊ…’ विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य, भुजबळ यु-टर्न घेणार? 

अमित शाह यांनी संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस आक्रमक झाली होती. निळ्या रंगाचा संबंध डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी जोडला जातो. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी निळे कपडे घालून संसदेबाहेर निदर्शने केली.तर आज (समोवर) परभणीत येऊन सोमवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीवेळी देखील त्यांनी निळ्या रंगाचा टी-शर्टही परिधान केला होता. यावर बोलताना राणे म्हणाले की, राहुल गांधीला महाराष्ट्र कुठं कळलाय. परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसता कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं, असं राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 20 लाख लाडक्या बहि‍णींना मिळणार हक्काची घरं 

नितीश राणे मंत्री झाल्याबद्दल नारायण राणेंनीही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, बाप, वडील खासदार, दोन मुले आमदार. त्यापैकी एक मंत्री आहे, देशात असं समीकरण कुठंचं नसेल. त्यामुळे आपण खुश आणि समाधानी आहाोत, असं ते म्हणाले.

राहुल गांधींचा परभणी दौरा निव्वळ राजकीय – फडणवीस
राहुल गांधींच्या परभणी दौऱ्याविषयी फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्ष काम करत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की, त्यांचे जे विद्वेषाचे काम आहे, ते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलं. आमचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी कऱण्यात येणार आहे. यात सर्व काही समोर येईल आणि एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube