‘आम्ही त्यांना साथ देऊ…’ विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य, भुजबळ यु-टर्न घेणार?

‘आम्ही त्यांना साथ देऊ…’ विजय वडेट्टीवारांचं सूचक वक्तव्य, भुजबळ यु-टर्न घेणार?

Vijay Wadettiwar Statement Support To Chhagan Bhujbal : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच् मृत्यू प्रकरण तर बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. दरम्यान या सगळ्यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. वडेट्टीवार यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर निशाणा साधला आहे.

बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकी कराड यांचं नाव समोर येतंय. यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंत्र्यांशी सबंध आहे. त्यामुळे मंत्रिपद असेल, तर निष्पक्ष चौकशी होणार नाही. धनंजय मुंडे यांना बाजूला करावे, (Maharashtra Politics) मग चौकशी करावी. जो सहकारी आहे, त्यांच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे, अश्या व्यक्तीची चौकशी कशी होणार? असा सवाल देखील त्यांनी केलाय.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! 20 लाख लाडक्या बहि‍णींना मिळणार हक्काची घरं

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर ओबीसी म्हणून अन्याय झाला हे तेवढेच खरे आहे. महायुतीने मतं घेतली तिघांनी वापरले, सत्ता आली आणि बाजूला केले. त्यामुळे भुजबळ नवा पर्याय शोधत असतील. ते निर्णय काय घेतात? यावर ओबीसी समाज ठरवेल. भुजबळ यांनी जी भूमिका घ्यायची, ते पद आणि सत्तेसाठी घेऊ नये. ओबीसी चळवळीसाठी घ्यावी, आम्ही त्यांना साथ देऊ.

पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, हुतूतू खेळ सुरू आहे. पालकमंत्री पण एक वर्षासाठी करा, रोटेशनमध्ये करा. हे सगळे लुटारू आहेत, महाराष्ट्र लुटण्यासाठी बरबाद करण्यासाठी आहे, अशी टीका त्यांनी केलीय. मराठी माणसावर महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हल्ले होतात, अपमान होत आहे. जिवानिशी मारण्याचे प्रकार होत आहे.याचे कारण सरकार त्यांचं आहे. मराठी माणसाचे सरकार नाही. त्यामुळे परप्रांतीय विश्वास दुणावला आहे. उद्या त्यांना शहरात, वार्डातील मराठी माणूस नको हवेत. सरकारला वाटते परप्रांतीयमुळे सरकार आले आहे, मराठी लोकांना हद्दपार करणार असं देखील ते म्हणालेत.

‘माझ्या मुलाला मारहाण करून त्याचे…’, सोमनाथ सुर्यवंशींच्या आईचा साश्रू नयनांनी दावा

लोकांचा जीव जाईपर्यंत मारहाण केली. कोंबींग ऑपरेशन झालं नाही, शवविच्छेदन अहवाल सांगत आहेत. या सगळ्या राज्यात असलेल्या नितीत दलित, आदिवासी कुठे नसतो. कोणी आवाज केलं तर मारू, काही झालं तर पाच-दहा लाख देवू, अशी सरकारची विकृत मानसिकता आहे. सत्तेची गुर्मी आहे. दलित कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू होतो, संविधान शिल्प तोडले जाते, ज्या पद्धतीने प्रकार हाताळला ते महाराष्ट्र बघतोय. बोलताना शब्द जपून वापरावे, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube