Download App

राहुल गांधी अहंकारी, आम्ही जवळून पाहिले; निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका

  • Written By: Last Updated:

राहुल गांधी अहंकारी आहे हे काँग्रेसमध्ये असताना आम्ही जवळून पाहिले, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर  वेगवगळ्या अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे पण विरोधी पक्षाकडून राहुल गांधीवरच टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा

नक्की काय काय म्हटले आहे ट्विटमध्ये ?

निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत म्हटले आहे की, “राहुल गांधी अहंकारी आहे हे काँग्रेसमध्ये असताना आम्ही जवळून पाहिले, मी गांधी आहे काही करू शकतो काही बोलू शकतो हा गैरसमज राहुल गांधी मधून जात नाही. ते खासदार म्हणून कधी वागलेच नाहीत, खासदारकीचा वापर फक्त सभागृह बंद पाडण्यासाठी केला, देशासाठी नाही मग खासदारकी गेली त्यात दुःख कसलं?”

दरम्याम काल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना 23 मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

राहुल गांधी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजतात, भाजपचा हल्लाबोल

या कारवाईवर कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आपला भाऊ राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द केल्याने भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. शुक्रवार, 24 मार्चला दिल्लीत कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाची उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रियंका गांधींनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, अदानींच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे लागू नये म्हणून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचं प्लॅनिंग करण्यात आलं आहे.

Tags

follow us