Download App

पुलवामावरून राजकारण पेटलं; शहीद जवानांचे फोटो शेअर करत राहुल गांधीचा मोदींवर थेट आरोप

Rahul Gandhi On Satyapal Malik Statement :  जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी द वायर या वृत्तवाहिनीला मुलाखत दिलेली आहे. यामध्ये त्यांनी धक्कादायक दावा केला आहे. यात त्यांनी पुलवामा हल्ला ही केंद्रीय गृह मंत्रालयाची सगळ्यात मोठी चूक होती, असे म्हटले आहे. यावरुन आता चांगलेच वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

आपल्या देशाच्या जवानांनी सुरक्षित प्रवासासाठी 5 एअरक्राफ्ट मागितले होते. मोदी सरकराने याला सरळ नकार दिल्याने त्यांना बसने प्रवास करावा लागला. रस्त्यामध्ये दहरशतवादी हल्ला झाला व 40 सैनिक शहिद झाले. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे पीएम मोदींना म्हणाले की, हे आपल्या चुकीने झाले आहे. यावर त्यांनी मलिक यांना चूप रहायला सांगितले. यांच्या चुकीमुळे आपल्या देशातील सैनिकांच मृत्यू झाला व हे लोक पीएम मोदींची प्रतिमा वाचवण्यासाठी काम करत होते. आपल्या सैनिकांपेक्षा जास्त त्यांना आपली प्रतिमा प्रिय आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले होते सत्यपाल मलिक

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला ही केंद्रीय गृह मंत्रालयाची मोठी चूक होती, असा खळबळजनक दावा मलिक यांनी केला. या हल्ल्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. या घटनेत सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ला हा विशेषत: सीआरपीएफ आणि गृह मंत्रालयाच्या अक्षमतेचा आणि निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप माजी राज्यपालांनी केला.

Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

पुलवामा हल्ल्याच्या वेळी राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री होते. मलिक यांनी दावा केला की सीआरपीएफने आपल्या जवानांसाठी विमान मागितले होते, परंतु गृह मंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर सीआरपीएफने ज्या रस्त्यावरून जवानांना पाठवले त्याचा तपास केला नाही. या हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केली होती.

Tags

follow us