लोकसभेत महिला आरक्षणाच्या नावाखाली मोदींचा मोठा डाव, राहुल गांधींचा गंभीर आरोप

महिला आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देतो. परंतु सरकार त्याच्या नावाखाली काहीतरी वेगळेच करू इच्छित आहे.

News Photo   2026 04 15T215927.319

लोकसभेत महिला आरक्षणाच्या नावाखाली मोदींचा मोठा डाव, राहुल गांधींचा गंभीर आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाच्या नावाखाली इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) हिस्सा चोरू इच्छित आहेत, जे एक ‘राष्ट्रविरोधी कृत्य’ आहे. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक सादर होण्याच्या एक दिवस आधी, राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला असून त्यामध्ये त्यांनी या विधेयकाला विरोध करणार असल्याचं सांगितलं आहे.

जर सरकारला महिला आरक्षण लागू करायचे असेल, तर ते केवळ विद्यमान ‘नारी शक्ती वंदन कायदा’ लागू करू शकतात. त्यांनी पुढे असंही म्हटलं की, जर सरकारला मतदारसंघ पुनर्रचना करायची असेल, तर ती नवीन जनगणनेच्या आधारावर केली पाहिजे, कारण त्यात ओबीसी लोकसंख्येची आकडेवारी असेल.

महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा! लोकसभेत खासदारांची संख्या किती वाढणार?

काँग्रेस पक्ष महिला आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देतो. परंतु सरकार त्याच्या नावाखाली काहीतरी वेगळेच करू इच्छित आहे. आता एक मोठा घात केला जात आहे. जात जनगणना आणि नवीन जनगणनेच्या आधारावर हे (महिला आरक्षण) लागू व्हावे, असं पंतप्रधानांना वाटत नाही. पंतप्रधान तुमचा (ओबीसी) सहभाग तुमच्याकडून हिसकावून घेत आहेत. त्यांना २०११ ची जनगणना वापरायची आहे, ज्यात ओबीसी लोकसंख्येचा समावेशच नाही असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) अस्वस्थ आहेत, कारण जात जनगणनेची आकडेवारी येऊ लागली आहे. त्यांना मागास जातींच्या लोकसंख्येचा आकार कळला आहे. तुम्हाला (ओबीसींना) तुमचा हक्काचा वाटा मिळावा, असं त्यांना वाटत नाही. हे एक राष्ट्रविरोधी कृत्य आहे. तसंच, मतदारसंघ पुनर्रचना धोकादायक असल्याचंही म्हटलं आहे.

Exit mobile version