Rahul Gandhi On PM Modi : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची इस्त्रायल आणि अमेरिकेच्या कारवाईत मृत्यू झाला आहे. मात्र या कारवाईवर भारताने अधिकृतपणे कोणतीही भूमिका न घेतल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत मोदी सरकारवर टीका केली आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी (PM Modi) जगावर हुकूमशाही करण्याचा मार्ग म्हणून राष्ट्रप्रमुखाच्या हत्येचे समर्थन करतात का? या मौनामुळे जगात भारताची प्रतिष्ठा कमी होत आहे.
या पोस्टमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, अमेरिका (America) , इस्रायल (Israel) आणि इराणमधील (Iran) वाढत्या शत्रुत्वामुळे एका नाजूक प्रदेशाला मोठ्या संघर्षाकडे ढकलले जात आहे. लाखो लोक, ज्यात जवळजवळ 1 कोटी भारतीयांचा समावेश आहे, अनिश्चिततेचा सामना करत आहेत. सुरक्षेच्या चिंता खऱ्या असल्या तरी, सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारे हल्ले संकट वाढवतील. इराणवरील एकतर्फी हल्ले तसेच मध्य पूर्वेतील इतर देशांवर इराणचे हल्ले यांचा निषेध केला पाहिजे. हिंसाचार हिंसाचाराला जन्म देतो – संवाद आणि संयम हा शांततेचा एकमेव मार्ग आहे.
Escalating hostilities between the United States, Israel and Iran are pushing a fragile region toward wider conflict. Crores of people, including nearly a crore Indians, face uncertainty.
While security concerns are real, attacks that violate sovereignty will only worsen the…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 3, 2026
या पोस्टमध्ये राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारत नैतिकदृष्ट्या स्वच्छ असले पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी जीवनाचे रक्षण करण्यासाठी स्पष्टपणे बोलण्याचे धाडस आपल्याकडे असले पाहिजे. आपले परराष्ट्र धोरण सार्वभौमत्वावर आणि वादांच्या शांततापूर्ण निराकरणावर आधारित आहे – आणि ते तसेच राहिले पाहिजे. पंतप्रधान मोदींनी बोलले पाहिजे. जगावर हुकूमशाही करण्यासाठी ते राष्ट्रप्रमुखाच्या हत्येचे समर्थन करतात का? आता मौन बाळगल्याने जगात भारताची प्रतिष्ठा कमी होते असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात रविवारी 1 मार्च रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता.
