Download App

Rahul Gandhi : ‘पुलवामाच्या शहीदांना श्रध्दांजली वाहण्यास गेलो तेव्हा बंदिस्त केलं’

Rahul Gandhi : पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होते तेव्हा मला विमानतळावरील खोलीत बंदिस्त केलं असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींवर आरोप करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मलिक आणि राहुल गांधी यांनी अनेक खुलासे केले आहेत.

Pune News : ऐन सणासुदीच्या काळात पुणेकरांची सत्व परीक्षा; ओला-उबरसह स्वीगी झोमॅटोची सेवा आज बंद

राहुल गांधी म्हणाले, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचे मृतदेह विमानतळावर येत असल्याचे कळताच मी थेट विमानतळावर गेलो. सुरक्षा रक्षक म्हणाले नाही जाऊ नका. पण मी जातोय म्हणालो. विमानतळावर गेल्यावर मला खोलीत कोंडून ठेवले होते. मला सांगण्यात आलं की तुम्ही खोली सोडू शकत नाहीत. दुसरीकडे शहीद जवानांच्या शवपेट्या आल्या होत्या, पंतप्रधानही येत होते आणि मला खोलीत कोंडले होते, त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.

‘…तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? संजय राऊतांचा खोचक सवाल

तसेच सत्यपाल मलिक पुढे म्हणाले, ‘ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी ते पंतप्रधान कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. मला 5-6 वाजता त्यांचा फोन आला. मी पंतप्रधानांना सांगितलं अनेक लोक मेले, त्यावर ते म्हणाले नाही-नाही, गप्प बस, आत्ता काही बोलू नकोस. एका तासानंतर मला माझा वर्गमित्र डोवालचा फोन आला. तोपर्यंत मी हे दोन वाहिन्यांना सांगितले होते. डोवालनेही मला यावर काही बोलू नका, असं सांगितलं असल्याचा मलिकांनी खुलासा केला आहे.

व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका; घरातच फरशीवर पडलेले आढळल्याने खळबळ

राहुल यांच्याशी संवाद साधताना मलिक म्हणाले की, आधी जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा परत केला पाहिजे आणि नंतर निवडणुका घ्याव्यात. कलम 370 मुळे त्यांना राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश बनवण्याइतका त्रास झाला नाही. मला वाटते की UT ची स्थापना झाली कारण पोलीस बंड करतील अशी भीती त्यांना वाटत होती तर पोलीस पूर्ण प्रामाणिकपणे सरकारच्या पाठीशी राहिले. ईदचे निमित्त होते पण पोलिसांनी सुट्टीही मागितली नाही.

दरम्यन, मी असे म्हणत नाही की त्यांनी हे केले आहे, परंतु त्यांनी पुलवामाकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला. ही त्यांची त्यावेळची भाषणे आहेत जेव्हा ते म्हणतात की, तुम्ही मतदानाला जाल तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याची आठवण करा, असंही मलिक म्हणाले आहेत.

follow us