काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरद्वारे पहिली प्रतिक्रिया दिलीय. ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा!, असं ट्विट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केलीय.
ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है।
इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा! pic.twitter.com/SYxC8yfc1M
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 3, 2023
जामीनासाठी आज राहुल गांधी सूरत न्यायालयात बहीण प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील काँग्रेस नेत्यांसमवेत पोहोचले होते. सूरत न्यायालयाकडून गांधींना जामीन मिळाल्यानंतर प्रियंका गांधींनीही एक सूचक वक्तव्य ट्विटद्वारे केलंय. प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘सूरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं धीरज खोते, विघ्नों को गले लगाते हैं, कांटों में राह बनाते हैं, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी दिलीय.
“सूरमा नहीं विचलित होते,
क्षण एक नहीं धीरज खोते,
विघ्नों को गले लगाते हैं,
काँटों में राह बनाते हैं।” https://t.co/O5S0y6gEMz— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 3, 2023
मोदी आडनावावरुन विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेत राहुल गांधी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कर्नाटकातील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरुन टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी सूरत न्यायालयात खटला सुरु होता. या खटल्यात सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी आडनावावरुन टीका केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाकडूनही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणी एसआयटीची स्थापना…
लोकसभा सचिवालयाकडून राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आलीय. या संपूर्ण घडामोडींनंतर राहुल गांधींनी आज सूरत न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केल्या आहेत. यामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, शिक्षा रद्द करण्यात यावी, शिक्षेप्रकरणी जामीनासाठीही त्यांनी याचिका केली होती. अखेर न्यायालयाने निवाडा करत राहुल गांधींचा जामीन मंजूर केला असून शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी पार पडणार आहे. तर शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयावर येत्या 13 एप्रिल रोजी सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, एकंदरीत जामीन मंजूर झाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विट करत मित्रकाळाविरोधात लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आहे. या संघर्षात सत्य माझे अस्त्र असून सत्य हाच माझा आसरा असल्याचं त्यांनी म्हटंलयं. सूरत न्यायालयात अपील करण्यासाठी राहुल गांधी यांच्यासोबत बहिण प्रियंका गांधीदेखील विमानाने सूरतला दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत देशातील तीन काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक ज्येष्ठ नेते न्यायालयात दाखल झाले होते.