Download App

खासदारकी जाताच राहुल गांधींचा ‘खतम, गया’ चा Video व्हायरल

Rahul Gandhi Video Viral : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना काल (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून ट्विटरवर त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राहुल गांधींचा ‘खत्तम, बाय-बाय, टाटा, गुड बाय, गया’चा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल होत आहे. यावरून राजकीय देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा संघर्ष सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत.

Live Blog । खरं बोलण्याची किंमत राहुल गांधींना चुकवावी लागली; देशभरात काँग्रेस आक्रमक

राहुल गांधी यांनी विदेशात केलेल्या काही वक्तव्यांवरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. त्यातून संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर हे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटक येथील सभेत चोर म्हटल्याबद्दल राहुल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मोदी आडनावाचे सारेच चोर असतात. पंतप्रधान मोदी चोर आहेत असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे मोदी आडनाव असलेल्यांची बदनामी झाली असा दावा सूरत न्यायालयासमोर करण्यात आला होता.

काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे ते लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. राहुल यांना शिक्षा झाल्यानंतरच त्यांची खासदारकी अडचणीत आली आहे. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आले आहे की, संविधानाच्या कलम १०२ (१) (ई) आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Tags

follow us