नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज विद्यापीठामध्ये भाषण केलं. त्यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यानचा दहशतवादी भेटल्याचा किस्सा सांगितला. राहुल गांधी यांनी असा दावा केला की सुरक्षा दलांनी त्याला काश्मीरमध्ये पायी न जाण्यास सांगितले होते. पण तरीही त्यांनी तो पायी प्रवास पूर्ण केला.
राहुल गांधी म्हणाले की जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की आमची हत्या केली जाऊ शकते. तरीही आम्ही प्रवास करत होतो. त्याचवेळी एका व्यक्तीने माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर सुरक्षारक्षकांनी त्याच्याशी बोलू नये असे सुचविले. तरीही त्या व्यक्तीला मी माझ्याकडे बोलावले. ती व्यक्ती माझ्याकडे आली.
हेही वाचा : Rahul Gandhi At Cambridge : पेगॅससद्वारे माझ्या फोनची हेरगिरी, राहुल गांधींचा गंभीर आरोप
राहुल यांनी पुढे सांगितले की त्या व्यक्तीने मला विचारले की, “आपण खरोखरच आमच्या समस्या ऐकण्यासाठी आले आहेत का?” मी हो म्हणालो. जेव्हा त्या व्यक्तीसोबत बोलत पुढे जात होतो तेव्हा त्या व्यक्तीने मला एका ठिकाणी पाहायला सांगितले, मी त्या बाजूला पाहिले. त्यावर त्या व्यक्तीने तिथे उभे असलेले लोक दहशतवादी असल्याचं सांगितलं.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, खरंतर दहशतवाद्यांनी मला मारले पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही होतो. मी त्याच्याकडे पहात होतो, तो मला पहात होता. काही वेळ मला असं वाटलं की मी मी अडचणीत आहे. आम्ही एकमेकांकडे पहात होतो. पण काहीही घडत नाही. आम्ही चालत पुढे निघून गेलो. राहुल म्हणाले की, “हे का घडलं?” कारण मी त्यांचे ऐकण्यासाठी आलो होतो. मी कोणताही हिंसाचार घडवण्यासाठी गेलो नव्हतो.
आपल्या याच भाषणात राहुल यांनी सरकारवर देखील टीका केली. ते म्हणाले की, मीडिया आणि न्यायव्यवस्था ताब्यात घेण्यात आली आहे. दलित, अल्पसंख्याक, आदिवासींवर हल्ले केले जात आहेत. राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी काश्मीरला जात होतो तेव्हा सुरक्षेचे लोक माझ्याकडे आले. ते म्हणाले की, “मी काश्मीरमध्ये प्रवास करू शकत नाही. हल्ला केला जाऊ शकतो. पण मी त्याला सांगितले, “मी काश्मीरमध्येही चालत प्रवास करेन.”