नवी दिल्ली – मानहानीच्या प्रकरणात (Defamation case) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नुकतेच लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. या शिक्षेविरोधात राहुल गांधी गुजरातमधील सुरत न्यायालयात (Surat Court) जाऊ शकतात. येथे ते आपल्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करून न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे. गांधींनी आपल्या याचिकेत ‘मोदी आडनाव’ प्रकरणात दोषी ठरवणारा दंडाधिकार्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी करणार आहेत.
दरम्यान, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि 30 दिवसांसाठी शिक्षा स्थगित केली होती. जेणेकरून त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ मिळेल. “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असते?” अशा कथित टिप्पणीसाठी भाजप आमदार पूर्णेश मोदी यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना आयपीसी कलम 499 आणि 500 अंतर्गत दोषी ठरवले होते.
छत्रपती संभाजीनगर घोषणेचा जनक कोण? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतच सांगितलं…
राहुल गांधी यांच्या कायदेशीर टीमने न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी पुरेशी तत्परता दाखवली नाही, असा आरोप भाजपने केला आहे. कर्नाटक निवडणुकीपूर्वी पक्ष त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या अटकेवर तत्काळ कारवाई झाली, पण राहुल गांधींना दोषी ठरवल्यानंतर कारवाई झाली नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, यावर काँग्रेसकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले.
या प्रकरणाबाबत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यापूर्वी सांगितले होते की कायदेशीर टीम यावर काम करत आहे. राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याबद्दल विरोधी पक्षांनी निषेध नोंदवला होता. प्रदेश काँग्रेसचे नेते आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींशी एकजूट दाखवण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन केले.