गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुन्हा धक्का दिला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज फेटाळला आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून बदनामी केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर स्थगिती मागितली होती. याच्या विरोधात काँग्रेस आता उच्च न्यायालयात जाणार आहे.
Gujarat | Surat Court rejects the application filed by Congress leader Rahul Gandhi seeking stay on his conviction in the 2019 defamation case on ‘Modi surname’ remark. pic.twitter.com/BMVyXTkAs7
— ANI (@ANI) April 20, 2023
Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकमधील एका सभेत राहुल गांधींनी ‘मोदी आडनावाबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. चार वर्षांनंतर 23 मार्च रोजी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुलला दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेमुळे लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की एखाद्या प्रकरणात खासदार आणि आमदाराला 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाते. एवढेच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते सहा वर्षे निवडणूक लढण्यासही अपात्र ठरतात.
Atiq-Ashraf च्या मारेकऱ्याची कबूली, हत्यारं देणाऱ्यांची सांगितली नावं
सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्याच्याविरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाकडून देण्यात येत आहे. यावर उद्याच काँग्रेसकडून सत्र न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यात येणार आहे. उच्च न्यायालायने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यास राहुल गांधी यांना पुन्हा त्यांचं लोकसभा सदस्यत्व पुन्हा प्राप्त होऊ शकतं.