Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र

Market Committee elections : श्रीगोंदा बाजार समितीसाठी पाचपुते-नागवडे कट्टर विरोधक एकत्र

Market Committee elections Shreegoda : सध्या राज्यात अनेक ठिकाणी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचं वातावरण आहे. यामध्ये आता श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांसाठी तब्बल 281 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीसाठी माघारीचे मोठे आव्हान असल्याने नेत्यांना धडकी भरली असून उर्वरित उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

इच्छुकांची मनधरणी करताना नेत्यांचे हाल होत असून आत्ता पर्यंत आठ जणांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी नेत्यांना यश आले आहे. मात्र उर्वरित उमेदवारांची मनधरणी करताना नेत्यांच्या नाकी नऊ आले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 281 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये सर्वाधिक १९१ उमेदवारी अर्ज सेवा संस्था मतदारसंघात दाखल झाले असून नागवडे, पाचपुते आणि जगताप गटाच्या दोन्ही पैनलचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या निवडणुकीसाठी आ.पाचपुते आणि नागवडे हे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत.

माजी राहुल जगताप यांनी सर्वपक्षीय पाचपुते-नागवडे विरोधकांची मोट बांधली आहे. निवडणुकीत धनिकांना उमेदवारी देण्याचे सर्वच नेत्यांचे मनसुबे दिसत असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा पुढच्या संधीची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे धनिकांना ‘वेटेज’ आणि निष्ठावंत ‘वेटिंग’वर अशीच परिस्थिती बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.

Shrigonda Market Committee : बाजार समिती निवडणूक भाजप-काँग्रेस एकत्र लढवणार

बाजार समितीच्या अठरा जागांसाठी तब्बल 281 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक 191 उमेदवारी अर्ज सेवा संस्था मतदारसंघात दाखल झाले आहेत. आजअखेर आठ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. निवडणुकीत माघार घेण्याची अंतिम मुदत आज आहे. तिन्ही नेत्यांच्या दोन्ही मंडळांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.

मात्र उर्वरित इच्छुकांची मनधरणी करून त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्हीकडून दुसऱ्या फळीतील बडे नेते देखील उतरण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे इच्छुक निष्ठावंत कार्यकर्त्यांची ‘कुचंबणा’ झाली असून त्यांना पुन्हा एकदा ‘माघार’च घ्यावी लागणार आहे.

या निवडणुकीसाठी दत्तात्रय पानसरे, लक्ष्मण नलगे, साजन पाचपुते, आदेश नागवडे, अतुल लोखंडे, मितेश नाहाटा, दत्तात्रय गावडे, प्रशांत ओगले आदी प्रमुख मंडळींची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणकोण रिंगणात उतरणार आणि कोण माघार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube