Download App

युद्धविरामावर चर्चेसाठी अधिवेशन बोलवा; राहुल गांधींचं थेट PM मोदींना पत्र

भारत-पाकिस्तान युद्धविरामावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केलीयं.

Rahul Gandhi News : भारताने ऑपरेशन सिंदुर मोहिम राबवून पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम देण्यात आलायं. भारताच्या या कारवाईला संपूर्ण देशभरातून समर्थन मिळालं. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) आणि मल्लिकार्जून खर्गे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहुन विशेष सत्र बोलवण्याची मागणी केलीयं. भारताने पाकिस्तानला पोहोचवलेल्या नुकसानीबद्दलची चर्चा संसदेत व्हावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केलीयं.

राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, विरोधी पक्षनेता म्हणून मी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करीत आहे. भारताच्या नागरिकांसाठी पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामावर चर्चा होणं गरजेचं आहे. युद्धविरामाची पहिली घोषणा ही अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मला विश्वास आहे, तुम्ही माझ्या मागणीवर गांभीर्याने विचार करुन निर्णय घ्याल, असं राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलंय.

“पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं घोर उल्लंघन; कठोर कारवाई करा”, केंद्र सरकारचे निर्देश

राहुल गांधी यांच्याआधी 28 एप्रिलला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. खर्गे पत्रात म्हटले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मी 28 एप्रिल रोजीच्या पत्राद्वारे तुम्हाला केली होती. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा पत्र लिहून सर्व विरोधी पक्षांच्या एकमताने केलेल्या विनंतीची माहिती दिली आहे. त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. संसदेच्या अधिवेशनात पहलगाम दहशतवाद, ऑपरेशन सिंदूर आणि प्रथम वॉशिंग्टन डीसी आणि नंतर भारत आणि पाकिस्तान सरकारांनी केलेल्या युद्धबंदीच्या घोषणांवर चर्चा करण्याची चर्चा असल्याचं खर्गेंनी पत्रात स्पष्ट केलंय.

follow us