Download App

Karnataka CM : राहुल गांधींनी शब्द पाळला; कर्नाटकातील जनतेसाठी ‘सोनिया’चे दिवस

Karnataka New Cabinet Meeting: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले होते. मुख्यमंत्री कोण होणार हा घोळ मिटल्यानंतर काँग्रेसने कर्नाटकात सरकार स्थापन केले आहे. काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 5 आश्वासने पूर्ण करणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, विधानसभा निवडणूक काळात काँग्रेसने 5 आश्वासने दिली होती. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक एक-दोन तासांत होणार आहे. त्या बैठकीत पाचही आश्वासनांचा कायदा केला जाईल. आम्ही तुम्हाला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ, राहुल गांधींनी सांगितले.

आजपासून कर्नाटकच्या लोकांना ही भेट मिळणार
1. 200 युनिटपर्यंत मोफत वीज
2. गरीब कुटुंबातील महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा 2 हजार
3. महिलांसाठी मोफत प्रवास
4. बेरोजगारांना दोन वर्षे भत्ता, पदवीधरांसाठी तीन हजार, डिप्लोमासाठी दीड हजार
5. बीपीएल कुटुंबांना दहा किलो तांदूळ मोफत

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रसने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला 19 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सिद्धरामय्या यांच्याबरोबरच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दोन हजारची नोट बंद झाल्यामुळे तुमच्या बँक ठेवीच्या व्याजदरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या…

या शपथविधीला राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही पोहोचले होते. याशिवाय इतर अनेक पक्षांचे विरोधी पक्षनेते या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्याबरोबच आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामध्ये जी परमेश्वर, प्रियांक खर्गे, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, सतीश जारकीहोली, रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.

Tags

follow us