Karnataka Assembly Election : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळालेत. राहुल गांधी यांनी बंगळूरुमध्ये एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटरवर 2 किलोमीटर प्रवास केला आहे. डिलिव्हरी बॉयसोबत फिरतानाचा राहुल गांधींचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोयं.
राणेंकडून मुलांची पाठराखण, ‘ते काही दारु पिऊन बोलत नाहीत… राणेंच रक्त बोलणारचं’
व्हिडिओमध्ये राहुल गांधी डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालवताना दिसले आहेत. यावेळी डिलिव्हरी बॉय स्कूटरच्या मागे बसला असून स्कूटरचं हॅंडल राहुल गांधींच्या हाती असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राहुल गांधी आणि डिलिव्हरी बॉय दोघांनीही हेल्मेट घातले होतं.
शरद पवारांची राजकीय खेळी! पहिला उमेदवारही केला जाहीर
राजधानी बंगळूरुमधील सभेसाठी आलेले राहुल गांधी आपल्या कारमधून उतरल्यानंतर त्यांना स्कूटरवर आलेला डिलिव्हरी बॉय दिसताच त्यांनी स्कूटर सवारी केली आहे. स्कूटरवरुन राहुल गांधींनी जवळपास 2 किलोमीटर प्रवास केला आहे. जेव्हा राहुल गांधी स्कूटरवर बसले त्यावेळी बघ्यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं होतं.
दरम्यान, कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं फिरतंय. येत्या 10 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या कर्नाटकात भाजपची सत्ता असून भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही पक्षातील उमेदवारांच्या जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांचं सुरु आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.