शरद पवारांची राजकीय खेळी! पहिला उमेदवारही केला जाहीर

शरद पवारांची राजकीय खेळी! पहिला उमेदवारही केला जाहीर

Abhijeet Patil Joins NCP : पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा थेट सोलापूरचा दौरा केला. येथे येत त्यांनी अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत घेत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात अभिजीत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आधी शिवसेनेचं अस्तित्व उभं करा मग…; प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

यावेळी आपल्या भाषणात शरद पवार म्हणाले, नेतृत्व तयार करावे लागते. तुम्ही हे नेतृत्व (अभिजीत) तयार केले आहे. अशा या नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहण्याचे काम नेते मंडळींचे असते. आता तुम्ही फक्त तयारीला लागा. मी फक्त एवढंच सांगतो की जेव्हा केव्हा निवडणुका येतील त्यावेळी राष्ट्रवादीचा, आमच्या सहकाऱ्यांचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल त्यावेळी अभिजीत पाटील यांचंच नाव घेतलं जाईल.

पवार म्हणाले, विठ्ठल कारखान्यात साखर, इथेनॉलसह अन्य महत्वाची कामे केली जातात. सभासदांच्या खिशात दोन पैसे जादा पडतील यासाठी अभिजीत पाटील यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. तुम्ही लोकांनीही त्यांना पाठिंबा दिला म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो.

सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर आता हा जिल्हा दूध आणि फळांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. पहिल्या दोन पिढ्यांनी चांगले काम केले. आता तिसरी पिढी आहे. नव्या नेतृत्वाकडेही माझे लक्ष असते. मी गेल्या काही वर्षांपासून अभिजीत पाटील यांच्याकडे बघत होतो. त्यांच्याशी चर्चा केली. सांगोल्याचा कारखाना घेण्याचे त्यांनी ठरवले. मोठ्या धाडसाने त्यांनी काम केले. तो कारखाना बारा वर्षे बंद होता. आता तो सुरू झाला आहे. बंद असलेले कारखाने चालू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी आदर्श घालून दिला.

प्रशांत पाटील काय, औदुंबर आण्णा पाटील काय या लोकांची ओळख ही नवीन कारखानदारी सुरू करण्याची आहे तर अभिजीत पाटील यांची ओळख जे दुकान बंद पडले ते चालू करण्याची आणि ग्राहकांना परवडेल अशा पद्धतीने दुकान चालवायचे ही आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. आज औदुंबर आण्णा, भालके नाना यांच्यानंतर हा तालुका मला राजकीयदृष्ट्या थोडा कोरडा वाटतो. पण मला खात्री आहे त्याचं हे कोरडेपण घालविण्याची ताकद अभिजीतमध्ये आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार अभिजीतच 

तुम्ही फक्त त्याच्या पाठिशी राहा त्याला उभे करा मी एवढंच सांगतो की जेव्हा केव्हा निवडणुका येतील त्यावेळी राष्ट्रवादीचा, आमच्या सहकाऱ्यांचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल त्यावेळी अभिजीत पाटील यांचंच नाव घेतलं जाईल, असे पवार म्हणाले.

नव्या जोमाने कामाला सुरुवात

अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्षाला येथे आणखी बळकटी मिळाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादीचे अभिजीत पाटील असा राजकीय संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.

‘मी मुख्यमंत्री कसा होतो, हे कोणी सांगण्याची आणि लिहण्याची गरज नाही’

गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांनी मातब्बरांना धुळ चारत विजय मिळवला. त्यानंतर ते पाटील चर्चेत आले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांपासून ते कारखाना यशस्वीपणे चालवत आहेत. अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नव्या जोमाने काम करणार तसेच नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी भाकरी फिरवण्याचे काम सुरू केल्याचे  पाटील यांच्या  पक्ष प्रवेशावरून दिसून येत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube