Rajasthan Assembly Election : राजस्थान राज्याच्या विधानसभा निवडणुका (Rajasthan Assembly Election) जवळ आल्या आहेत. या वर्षातील नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निवडणुका होतील असा अंदाज आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) काही दिवसांपासून शांत असल्याने काँग्रसेचे(Congress) टेन्शन कमी होत असल्याचे दिसत असतानाच आता एका सर्व्हेने काँग्रेसला पुन्हा संकटात टाकले आहे.
काँग्रेसने राज्यात तीन सर्व्हे केले आहेत. या सर्व्हेतून जे निष्कर्ष समोर आले आहेत त्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. सर्व्हेनुसार, काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काही -बदल करावे लागणार आहेत. राज्यात एकूण 200 जागा आहेत. त्यापैकी 120 मतदारसंघात उमेदवार बगलण्याची गरज आहे. जवळपास 60 टक्के उमेदवार बदलावेत असे या सर्व्हेत म्हटले आहे.
ठरलं तर! बुधवारी ‘या’ वेळेला चंद्रावर उतरणार चांद्रयान; ISRO ने केलं कन्फर्म
एनडीटीवीने या सर्व्हेच्या हवाल्याने सांगितले, की ज्या 120 मतदारसंघात उमेदवार बदलण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे तेथे 45 आमदार आहेत आणि 85 पराभूत झालेले उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, 45 विद्यमान आमदारांनाही बदलण्याची गरज असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. त्यामुळे या 120 जागांमुळे पक्षात खळबळ उडाली आहे.
काँग्रेसद्वारे केल्या गेलेल्या या तिन्ही सर्व्हेत मंत्री आणि अनेक आमदारांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. म्हणजेच आमदार आणि मंत्र्यांच्या कामगिरीवर लोक नाराज आहेत. यामध्ये काही वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे अनेक नेत्यांचे अहवाल सकारात्मक आहेत. आता असे सांगितले जात आहे की कदाचित याच सर्व्हेच्या आधारावर तिकीट वाटप होण्याची शक्यता आहे. ज्या नेत्यांचे अहवाल चांगले आहेत त्यांना पुन्हा तिकीट मिळेल तर ज्यांचे अहवाल नकारात्मक आहेत त्यांना कामगिरीत सुधारणा करण्यास सांगण्यात आले आहे. निवडणुकांसाठी आता तीन ते चार महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे संकटात असणाऱ्या या 120 मतदारसंघांसाठी काँग्रेस आपल्या प्लॅनमध्ये बदल करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
‘इंडिया’त बिघाडी! राजस्थानात ‘आप’ देणार इंडियाला टक्कर; सर्व जागांवर उमेदवार देणार?
केंद्रातील सत्ताधारी भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी झाली. आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. मात्र, त्याआधीच या आघाडीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. ‘आप’ इंडिया आघाडी सोडून राजस्थानात स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. पक्षाचे राजस्थान प्रभारी विनय मिश्रा यांनीच ही माहिती दिली आहे.