Download App

Rajasthan : पहिलं आश्वासन पूर्ण; नव्या वर्षात 450 रुपयांत मिळणार गॅस

Rajasthan Politics : राजस्थानात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजपाने (Rajasthan Politics) येथील लोकांना जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. पहिले आश्वासन पूर्ण करताना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात 1 जानेवारी 2024 पासून उज्ज्वला गॅस सिलेंडर 450 रुपयांत देण्याची घोषणा केली आहे. राजस्थानातील टोंक येथे आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत मुख्यमंत्री शर्मा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली. राजस्थानात निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाने जाहीरनाम्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर 450 रुपयांत देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींची गॅरंटी म्हणत भाजपने या योजनांचा मोठा प्रचारही केला होता. आता याच आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने राज्य सरकारने वाटचाल सुरू केली आहे.

Rajasthan : मोदी शाहंच्या मनाचा अंदाज लागेना; पहिल्यांदा आमदार झालेले भजनलाल शर्मा थेट CM

राजस्थानात भाजपाने उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांत गॅस सिलिंडर देणार. अडीच लाख युवकांना पाच वर्षात सरकारी नोकरी देणार. शेतकरी सन्मान निधीअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करणार. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन आणि अँटी रोमियो स्क्वॉड गठीत करणार. बारावीतील विद्यार्थीनींना स्कूटी देणार. गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींचे केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार, अशी काही आश्वासनं भाजपने दिली होती.

याआधी काँग्रेस सरकारने एप्रिल 2023 मध्ये उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 500 रुपयांत गॅस सिलिंडर देणे सुरू केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 22 डिसेंबर 2022 मध्ये स्वस्तात गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते. पण या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यास चार महिने लागले. या निर्णयाला विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जात होते. मात्र यावर कडी करत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात गॅस सिलिंडर 450 रुपयांत देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे यश निवडणूक निकालात दिसून आले.

Elections 2024 : महाराष्ट्रात भाजपाचा एमपी-राजस्थान पॅटर्न? आमदार-खासदारांचं तिकीटच ‘अनसेफ‘ 

follow us