Download App

Rajasthan Election 2023 : पुन्हा सरकार आल्यास महिलांच्या खात्यात 10 हजार; राहुल गांधींची घोषणा

Rajasthan Election 2023 : काँग्रेसशासित राजस्थानात निवडणुकांची रणधुमाळी (Rajasthan Election 2023) जोरात सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच असा चंग काँग्रेसने बांधला आहे. तर दुसरीकडे भाजपही फॉर्मात दिसत आहे. राजस्थानात धक्का बसू शकतो याचा अंदाज आल्याने काँग्रेसने मतदारांवर आश्वासनांची खैरात सुरू केली आहे. राजस्थानात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी दहा हजार रुपये जमा केले जातील अशी मोठी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. राजस्थानतील दौसा येथील जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली. याव्यतिरिक्त काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. जी स्ट्रॅटेजी कर्नाटकच्या निवडणुकीत वापरली तशीच पद्धत राजस्थानातही वापरली जात आहे.

Rajasthan Election : राजस्थानच्या निवडणुकीत ‘ईडी’ची एन्ट्री! CM गेहलोतांचा मुलगाच अडचणीत

राज्यात काँग्रसचं सरकार पुन्हा आल्यास पाचशे रुपयांच गॅस सिलिंडर मिळेल. काँग्रेस सरकारच्या काळात पूर्ण राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या. हे काम पुढेही सुरुच राहिल, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी (नरेंद्र मोदी सरकार) जुनी पेन्शन योजना रद्द केली पण आम्ही राजस्थानात ही योजना लागू केली. या निर्णयामुळे लाखो लोकांना मोठा फायदा झाल्याचे राहुल यांनी सांगितले.

आता अदानी की जय म्हणा 

उद्योगपती गौतम अदानींवरूनही राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, पंतप्रधानांनी ‘भारत माता की जय’ ऐवजी ‘अदानी की जय’ असे म्हटले पाहिजे. कारण, सध्या ते अदानींसाठीच काम करत आहेत. भाजपाला दोन हिंदुस्तान निर्माण करावेत असे वाटते. एक अदानींसाठी आणि दुसरा गरीरबांसाठी. काहीही झालं तरी पंतप्रधान मोदी जातिनिहाय जनगणना करणार नाहीत. हे काम फक्त राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षच करू शकतो, असेही राहुल गांधी म्हणाले.

Rajasthan Election 2023 : नागपूरमध्ये प्लॉट, दिल्लीत घर; मुख्यमंत्री गहलोतांची संपत्ती किती वाढली?

राजस्थानची परीक्षा काँग्रेससाठी अवघड 

राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यात भाजपला येश मिळण्याची शक्यता आहे. 200 जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपला 114 ते 124 जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेसला 67 ते 77 जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना 5 ते 13 जागा मिळू शकतात. असे झाले तर सत्ताधीश काँग्रेसला पराभूत करण्यात भाजप यशस्वी ठरला.

Tags

follow us