Download App

Rajasthan Election : भाजपची रणनीती ठरली! राजस्थानातही MP चाच फॉर्मुला; सत्ता खेचण्यासाठी 7 शिलेदार रिंगणात

Rajasthan Election : निवडणूक आयोगाकडून देशातल्या पाच राज्यांच्या निवडणूका जाहीर होताच भाजपने आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीयं. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम अशा पाच राज्यांत निवडणुका पार पडणार आहेत, त्यासाठी मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही भाजपने आपल्या 41 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीयं. काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून मध्य प्रदेशचाच फॉर्मुला वापरण्यात आला. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत 3 केंद्रीय मंत्र्यांना उतरवल्यानंतर आता राजस्थानातही लोकसभेच्या 7 खासदार रिंगणात उतरवले आहे. हे 7 खासदार आहेत तरी कोण? राजस्थानात त्यांची पकड कशी? यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात…


MP Election : चर्चेला पूर्णविराम! शिवराज सिंह यांना तिकीट मिळालं; भाजपची दुसरी यादी जाहीर

राज्यवर्धन सिंह राठोड :
भाजपचे खासदार राज्यवर्धन सिंह राठोड यांना जयपूरमधील झोटवाडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलीयं. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी 2014 मध्ये राजस्थानच्या जयपूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ. जोशी यांचा पराभव केल्यानंतर ते 16 व्या लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांना मोदी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री करण्यात आले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा त्याच जागेवरून उभे राहिले आणि विजयी झाले.

‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल

खासदार दिया कुमारी :
राजसमंद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार दिया कुमारी आता जयपूरच्या विद्याधरनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. दिया कुमारी महाराजा सवाई भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांची एकुलती एक मुलगी आहे. दिया कुमारी 2013 मध्ये भाजपच्या तिकिटावर सवाई माधोपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यानंतर 2019 मध्ये त्या राजसमंद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाल्या.

अमित शहांपर्यंत गेलेला भाजप-शिवसेनेतील वाद; कारण ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकांची अखेर बदली!

किरोरी लाल मीना :
भाजपचे राज्यसभा खासदार किरोरीलाल मीना यांना सवाई माधोपूर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले. मीना यांची एक शेतकरी नेते म्हणून ओळख आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेस सरकारला विविध प्रश्नांवर कोंडीत पकडणारे नेते आहेत. बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि पेपरफुटी या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

भगीरथ चौधरी​ :
भाजपचे दिग्गज नेते खासदार चौधरी यांना अजमेरमधील किशनगड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. भगीरथ हे अजमेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते राजस्थान 2013 च्या विधानसभा निवडणुकीत किशनगड मतदारसंघातून आमदारही राहिले आहेत. भाजपने पुन्हा एकदा त्यांना बालेकिल्ल्यातूनच उमेदवारी दिली. एक तळागाळातील नेते म्हणून भगीरथ यांची ओळख आहे.

आमचा डीएनए तपासायच्या आधी स्वत:चा डीएनए तपासा, तुमचा डीएन फिरोज…; अनिल बोंडेंची टीका

यासोबतच भाजपने नरेंद्र कुमार यांनाही मांडवा मतदारसंघातून उमेदवारी दिलीयं. नरेंद्र कुमार झुंझुनू लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. नरेंद्र यांनी 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच खासदार देवजी पटेल यांनाही भाजपने सांचोर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलंयं. देवजी पटले सध्या जालोरे सिरोही लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विद्यमान खासदार झालेले आहेत. यासोबतच बाबा बालकनाथ यांना भाजपने तिजारा मतदारसंघातून उमेदवारी दिलीयं. हा मतदारसंघ राजस्थानमधील अलवरमध्ये असून बालकनाथ हे अलवर खासदार आहेत.

दरम्यान, आत्तापर्यंत राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात सत्ता बदल अनेकदा पाहायला मिळाला आहे. 2018 च्या निवडणुकीत भाजपला काहीशा कमी जागा मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही. यंदाच्या वर्षी काँग्रेस आणि भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? हे गुलदस्त्यात ठेऊनच निवडणुका लढवणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसला सत्ता टिकवणं आणि दुसरीकडे भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागूनच सत्ता मिळवावी लागणार असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us