Download App

मी सचिन पायलट यांच्या एकाही समर्थक उमेदवाराला…; CM अशोक गेहलोत स्पष्टच बोलले

  • Written By: Last Updated:

Rajasthan Election 2023: गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय घडामोडींना वेग आला. कॉंग्रेससह भाजप पक्षाकडून राज्यात जोरदार प्रचार केला जात आहे. इथं काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. मात्र, राजस्थानचे राजकारण थोडे रंजक आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी ज्यांच्या नावाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) नाराज व्हायचे ते सचिन पायलट आज राज्यात पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत.

Jhimma 2: हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा एकत्र करणार धम्माल: ‘झिम्मा २’ सिनेमा ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित 

राजस्थान कॉंग्रेसमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाढता कलह हायकमांडसाठी डोकेदुखी ठरला होता. मात्र, आता गेहलोत आणि पायलट हे खांद्याला खांदा लावून काम करतांना दिसत आहे. दरम्यान, गुरुवारी दिल्लीत गेहलोत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी सचिन पायलट यांच्या समर्थक उमदेवारांना तिकीट मिळू नये, अशी गेहलोतांची इच्छा आहे, तर अशोक गेहलोत गटाच्या नेत्यांना तिकीट मिळू नये, अशी सचिन पायलट यांची इच्छा असल्याचं बोलल्या जातं. आगामी निवडणुकीत दोन्ही गटाच्या नेत्यांना तिकीट मिळाले नाही, तर अशा परिस्थितीत राजस्थानमधील निवडणूक कशी जिंकणार? असा सवाल त्यांना केला.

आम्ही एकच, पायलट समर्थंकांना विरोध केला नाही
यावर बोलतांना गेहलोत म्हणाले, मी सचिन गटाच्या एकाही उमेदवाराला विरोध केला नाही. आता आमच्यात वाद का होत नाही, ही विरोधकांची अडचण आहे. आम्ही सर्व एकच आहोत. सर्वांच्या मतानुसार निर्णय घेतले जातात. मी पायलट यांच्या एकाही समर्थक उमेदवारला विरोध केला नाही. आता आम्ही जुन सर्व विसलोय, असं गेहलोत म्हणाले.

ते म्हणाले की, ज्या आमदारांनी त्यांच्या भागात विकासकामे केली आहेत त्यांना पक्षाच्या तिकीटापासून वंचित ठेवता येणार नाही.

उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर
राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होऊ शकते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतसारा, सचिन पायलट आणि मंत्र्यांची नावे पहिल्या यादीत असू शकतात. याशिवाय सातत्याने विजयी झालेल्या नेत्यांची आणि पायलट गटातील अनेक उमेदावारांची नावं या यादीत असू शकतात.

Tags

follow us