Rajasthan News : राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur)येथील शाळेतील विद्यार्थ्यांना (Students)गुड मॉर्निंगऐवजी(Good morning) जय श्री राम म्हणणं चांगलंच महागात पडलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी जय श्रीराम (Jai Shri Ram)म्हटल्यामुळे शाळेतील एका महिला शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केली आहे. ही घटना थिंगला परिसरात असलेल्या राधाकृष्णन शाळेत घडली आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सकाळी गुड मॉर्निंगऐवजी जय श्री राम म्हटले होते, त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षकाने शिक्षा केली आहे.
चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्यधीश! Narayan Murthy यांच्याकडून नातवाला 240 कोटींचे शेअर्स गिफ्ट
याप्रकरणी एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. त्या विद्यार्थिनीच्या वडिलांचे म्हणणं आहे की, मुलीचा शाळेत खूप अपमान करण्यात आला आणि शिक्षा म्हणून तिला हात वर करुन उभे केले.
ECI चा मोठा निर्णय; मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासह 6 राज्यांच्या गृहसचिवांना हटवलं
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आपल्या मुलीला बसमध्ये बसवताना आपण बसमधील मुलांना जय श्री राम म्हटलं. त्यावर काही मुलांनी जय श्री राम म्हणत प्रतिसाद दिला. त्यानंतर बस पुढे निघून गेली. आणि त्याच्यानंतर बस 500 मीटर पुढे गेल्यावर बसमधील प्रियांका मॅडमने मुलांना दम दिला की, जर तुम्ही पुन्हा जय श्री राम म्हणाल तर तुम्हाला शाळेतून काढून टाकले जाईल. एवढ्यावरच त्या न थांबत त्यांनी मुलांना शिक्षा म्हणून हात वर करुन उभा केले.
त्या विद्यार्थिनीच्या वडिलांचं म्हणणं आहे की, मुलांना शाळेत फक्त हाय, हॅलो, बाय आणि गुड मॉर्निंग म्हणता येईल, जय श्री राम असे म्हणता येणार नसल्याच्या सूचना देखील शाळेत देण्यात आल्या आहेत. शाळेत जय श्री राम म्हणण्यास मनाई करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीने आपल्या घरी आल्यानंतर घडलेली संपूर्ण घटना घरच्यांना सांगितली. या प्रकरणाची माहिती मिळताच मुकेश योगी दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. मात्र शाळा संचालक तीन-चार दिवसांच्या सुट्टीवर गेले होते. तब्बल 4 दिवसांनंतर तो पुन्हा शाळेत पोहोचला आणि संपूर्ण हकीकत शाळा संचालकांना सांगितली. यावेळी मुख्याध्यापिका ममता माहेश्वरी यांनी मुलांना शाळेत शिकवायचे असेल तर शाळेत गुड मॉर्निंगच म्हणावे लागेल, असे सांगितले.