Download App

अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, पंतप्रधान मोदींना मागितला वेळ

  • Written By: Last Updated:

Ayodhya Temple : अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी 16 ते 24 जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. अयोध्येत त्या दिवशी एकच कार्यक्रम असावा आणि तोही अराजकीय असावा, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मत आहे. याशिवाय त्या कार्यक्रमासाठी कोणताही स्टेज बनवला जाणार नाही.

या कार्यक्रमासाठी अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या विशेष पाहुण्यांना बोलण्यासाठी कमी वेळ दिला जाणार आहे. पण त्या दिवशी कोणतीही जाहीर सभा आयोजित केली जाणार नाही. इतकंच नाही तर कार्यक्रमात इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले जाणार नसून फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच आमंत्रित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून 5000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर राम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे देशभरात प्रक्षेपण करण्याचीही तयारी सुरू आहे, जेणेकरून लोकांना हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या गावातून, शहरातून आणि इतर ठिकाणांहून पाहता येईल.

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा आना, आमदार प्रसाद लाड आक्रमक

अयोध्येत राम मंदिर बांधणाऱ्या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी 27 जुलै रोजी सांगितले होते की, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधानांना अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. या सोहळ्याला पंतप्रधानांनी हजेरी लावल्यास जगभर देशाची प्रतिमा अधिक मजबूत होईल, असे या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचे पुणे दौरे वाढले; उद्धव ठाकरेंनी सांगितला अर्थ…

त्यांनी सांगितले होते की, या कार्यक्रमासाठी 16 ते 24 जानेवारी दरम्यानची तारीख निमंत्रण पत्रात देण्यात आली आहे, परंतु कार्यक्रमाची तारीख पंतप्रधानांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. या सोहळ्यासाठी 10,000 लोकांना निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे राय यांनी सांगितले होते. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधानांनी राम मंदिराचे ‘भूमिपूजन’ही केले होते.

Tags

follow us