Download App

Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही

Image Credit: Letsupp

Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाकडे मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी पाठ फिरवल्याचं पाहायाला मिळत आहे. एकीकडे या कार्यक्रमावरून विरोधक भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यात आता शंकराचार्यांनी देखील या कार्यक्रमावर नाराज व्यक्त केली आहे.

‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही

अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाची तारीख, यजमान त्याचबरोबर मंदिराचं अर्धवट असलेलं बांधकाम यावरून संत महंतांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यामध्ये पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी अवमुक्तेश्वरानंद यांनी राम मंदिर सोहळ्याला येण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर इतर दोन शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितले नसले तरी देखील ते देखील या कार्यक्रमाला येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

आमदार पात्रतेच्या निकालानंतर किरण मानेंची पोस्ट चर्चेत! म्हणाले, ‘जब बंदूक न हुई, तब तलवार होगी’

या कार्यक्रमाला न येण्याचं कारण सांगताना द्वारकापीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती त्यांनी म्हटलं की, अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरामध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापना करणे न्याय आणि धर्मसंगत नाही. आम्ही पंतप्रधान मोदींना विरोध करत नाही. मात्र सल्ला देत आहोत की, शास्त्रसंमत कार्य करा. तसेच त्यांनी सांगितलं की 1992 ला अशाच प्रकारे मुहूर्त न बघता राममूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र आता सर्वकाही शास्त्रोक्त पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा. अशी देखील मागणी या शंकराचार्यांनी केले. कारण चंपत राय म्हटले होते की, राम मंदिर रामानंद संप्रदायाचे लोकांचा आहे शैव आणि शाक्त यांचं नाही.

PM Modi उतरणार नाशिकच्या रस्त्यावर; रोड शोसाठी नाशिक शहराचे रूपडे पालटले

त्यामुळे राम मंदिराच्या निर्माणावर या शंकराचार्यांचा कोणताही आक्षेप नाही. मात्र शास्त्रोक्त पद्धतीने सर्व विधी केले जावे. तशी मागणी त्यांची आहे. तसेच निर्मोही आखाड्याला पूजेच्या अधिकार तर रामानंद संप्रदायाला मंदिर व्यवस्थेची जबाबदारी द्यावी. अशी ही मागणी त्यांनी केली. तर पुरी येथील शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेवर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की पंतप्रधान लोकार्पण करणार. म्हणजे मूर्तीला स्पर्श करणार. त्यासाठी मी टाळ्या का वाजवू?

follow us

वेब स्टोरीज