Download App

Ram Mandir : महाराष्ट्राचं लाकूडं ते गुजरातचे आर्किटेक्ट; सर्व राज्यांचं राम मंदिरासाठी योगदान

Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir) चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हे राम मंदिर बनवण्यासाठी देशातील सर्व राज्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलं आहे. महाराष्ट्राचे लाकूड ते गुजरात आर्किटेक्ट कसं निर्माण केलं श्रीराम मंदिर चला तर पाहूयात…

Shahir Dinanath Sathe Passed Away : शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर यांचं निधन

राम मंदिर निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील कारागिरांनी आपली कामगिरी दाखवली. यामध्ये राजस्थान, ओरिसा आणि मध्यप्रदेश या राज्यातील शिल्पकारांनी दगडांवरती कोरीवकाम केले. त्यासाठी लागणारे गुलाबी रंगाचे सॅन्ड स्टोन हे राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील वंशीपहाडपूर गावातून आणण्यात आले आहेत. कारण हे दगड मजबूत असतात.

Manoj Saunik :राज्याच्या मुख्य सचिवांना मुदतवाढ? पोलीस महासंचालकपदी कोणाची वर्णी लागणार?

तर मंदिराचे 14 दरवाजे बनवण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलांमधून लाकूड नेण्यात आलं आहे. हैदराबादच्या कारागिरांवर हे दरवाजे बनवण्याचे काम सोपवण्यात आलं होतं. तर त्याचे डिझाईन हे कन्याकुमारी येथील कारागिरांकडून करण्यात आले. मंदिरासाठी वापरण्यात आलेली फरशी ही मकराना येथील दगडांपासून बनवण्यात आली आहे. तर त्यासाठी लागणारे ग्रॅनाईट हे तेलंगणा आणि कर्नाटकमधून आणण्यात आले. तसेच या मंदिराच्या निर्माणच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलायचं झालं. तर हे कॉन्ट्रॅक्ट एल अॅंड टी कंपनीला देण्यात आले होते. तसेच काम क्रॉसचेक करण्यासाठी टाटा इंजीनियरिंग त्यांना देखील सांगण्यात आलं आहे.

मोदी सरकारचं नवीन वर्षांत मोठं गिफ्ट…पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार?

बांधकामासोबतच गुजरातमधील चंद्रकांत सोमपुरा हे या संपूर्ण प्रकल्पाचे मुख्य आर्किटेक आहेत. या प्रकल्पात काम करण्यासाठी 300 हून अधिक कारागिरांना त्यांच्या कार्यकुशलतेच्या आधारावर वेगवेगळ्या राज्यातून निवडण्यात आले. त्याचबरोबर मंदिरामध्ये बनवण्यात आलेल्या फॅब्रिकेशन आणि दरवाजांवरती सोने आणि चांदीचा मुलामा चढवण्याचे काम दिल्ली, हरियाणा आणि पंजाब येथील कारागिरांना आणि एजन्सीचा दिलं आहे.

राज्यसभेत ‘आप’चे नेते म्हणून राघव चड्ढांना संधी नाही, सभापतींनी फेटाळली केजरीवालांची विनंती

मंदिराच्या निर्माणामध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याचप्रमाणे मंदिर निर्माण करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये देखील वैविध्य आहे. ते म्हणजे समितीतील मुख्य भूमिका निभावणारे चंपत राय, डॉ. अनिल मिश्र, अयोध्येच्या राजघराण्याशी संबंधित असणारे बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्र आणि महंत दिनिंद्र दास हे उत्तर प्रदेशचे, गोपाल राव हे दक्षिणेतील तर मंदिराचे ट्रस्ट कामेश्वर चौपाल हे बिहारचे आहेत.

त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या भव्य अशा 51 इंची दिव्य मूर्तीची निर्मिती ही तीन विशेष मूर्तिकार करत आहेत. ज्यामध्ये कर्नाटकचे गणेश भट्ट आणि अरुण योगीराज यांनी काळ्या रंगाच्या संगमरवरी दगडापासून दोन श्माम म्हणजेच कृष्णवर्णीय मुर्त्या बनवल्या आहेत. तर राजस्थानच्या जयपूर येथील सत्यनारायण पांडे यांनी संगमरवरी दगडातून तिसरी श्वेत रंगाची मूर्ती निर्माण केली आहे. तसेच 22 तारखेला होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये देखील विविध वैदिक आणि धार्मिक कार्यक्रमांची जबाबदारी आचार्य पंडित लक्ष्मीकांत दिक्षित आणि गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्यावर देण्यात आली आहे. गणेश्वर हे काशीमध्ये राहत असले तरी ते मूळचे दक्षिणेतील आहेत. त्यामुळे आहे ना खरचच जवळपास संपूर्ण भारताचं राम मंदिराच्या निर्मितीमध्ये योगदान.

follow us