Download App

मोदी सरकारचं नवीन वर्षांत मोठं गिफ्ट…पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार?

Petrol-Diesel Rate : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच निवडणुकीआधीच मोदी सरकारकडून (Modi Govt) जनतेला मोठं गिफ्ट मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. नवीन वर्षांत मोदी सरकारकडून पेट्रोलचे दर (Petrol-Diesel Rate) स्वस्त करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पेट्रोलचे दर 10 रुपयांची स्वस्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये येणार अॅपलसारखे फीचर्स! व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार ऑडिओ-व्हिडिओ शेअर

देशात सध्या महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीसह इतर अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांकडून मोदी सरकारला धारेवर धरलं जात आहे. अशातच आगामी लोकसभा निवडणुका लागणार असल्याने मोदी सरकारकडून हा मास्टस्ट्रोक असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याचीच परिस्थिती आहे. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा दराने प्रति लिटर आहेत. अशातच आता थेट पेट्रोलच्या दरात 10 रुपयांनी घट झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना मोठा अर्थिक दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयकांत यांची हत्या? दिग्दर्शकाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

पेट्रोलचे दर सध्या 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत. सुत्रांच्या माहितीनूसार या दरामध्ये घट करण्यासंबंधी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हालचाली सुरु आहेत. पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आल्याचंही समजतंय. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीसाठी अवधी लागत असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांत पेट्रोलच्या दराबाबत केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

‘आंबेडकरांच्या प्रस्तावाचा विचार…’; वंचितच्या फॉर्म्युल्यावर जयंत पाटलांचं मोठं विधान

दरम्यान, नवीन वर्षांसाठी पुढील दोन दिवसांचा अवधी उरला आहे. नवीन वर्षासाठी देशभरात उत्साहाचं वातावरण असतानाच पेट्रोलचे दर कमी केल्यास जनतेला दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता मोदी सरकारकडून पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us