दाक्षिणात्य सुपरस्टार विजयकांत यांची हत्या? दिग्दर्शकाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ
Alphons Puthren On Vijayakanth Death: साऊथ सुपरस्टार आणि DMDK प्रमुख विजयकांत (Vijayakanth Death) यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर (social media) अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, मल्याळम दिग्दर्शक अल्फोन्स पुथरेन (Alphonse Puthren) यांनी विजयकांतच्या निधनाबद्दल एक दावा केला आहे, यामुळे त्याच्या चाहत्यांना आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या इंस्टाग्रामवर युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यासाठी एक पोस्ट शेअर करताना अल्फोन्सने लिहिले आहे की, ‘मी तुम्हाला भेटण्यासाठी केरळमध्ये आलो आणि तुम्हाला राजकारणात पुन्हा एकदा येण्यास सांगितले. मी तुम्हाला विचारले की तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांची हत्या कोणी केली? जयललिता यांची हत्या कोणी केली? आता तुम्हाला शोधावे लागेल की कॅप्टन विजयकांतलाही कोणी मारले…? अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर दिसत आहे.
अल्फोन्स पुथ्रेनने केला धक्कादायक दावा!
ते पुढे लिहितात की, ‘जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर त्यांनी कमल हासन आणि तुमचे वडील एमके स्टॅलिन सर यांच्यावरही हल्ला केला आहे. तरीही तुम्ही खुनी पकडण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुढचे लक्ष्य तुम्ही किंवा स्टॅलिन साहेब असतील.
Vijayakanth Death: दिग्गज अभिनेते विजयकांत यांचे निधन; सोनू सूदने व्यक्त केला शोक
शिवाय अल्फोन्सने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यांनी तामिळ अभिनेता अजित कुमारला टॅग केले आहे आणि लिहिले आहे, ‘मी ऐकले होते की तुम्ही लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहात. पण हे अजून दिसलेले नाही. एकतर ज्यांनी मला ही बातमी दिली ते खोटे बोलले असावं, नाहीतर लोक तुमच्याविरुद्ध कट करत आहेत हे तुम्ही विसरलात. मी याबद्दल काहीही का बोलत नाही? कृपया या प्रश्नाचे उत्तर मला जाहीर पत्राद्वारे द्या. मात्र, अल्फोन्सच्या या प्रश्नांची उत्तरे अद्याप कोणीही दिलेली नाहीत.