मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता ९ महिन्यांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. अशात भाजप आणि काँग्रेस सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. बैठका, रणनीती, मतदारसंघ अभ्यास, उमेदवार चाचपणी अशा गोष्टींचा अभ्यास सुरु आहे. मे महिन्यात लोकसभेची मुदत संपत असल्याने मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर राजकीय समीकरणांसोबतच जातीय समीकरणे सुधारण्याचे प्रयत्न भाजपने सुरु केले आहेत. या दरम्यान, आता एक मोठा निर्णय घेत पक्ष नेतृत्वाने मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या राज्यसभेच्या सर्व भाजप खासदारांना 2024 मधील लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार राहण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.
Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!
माहितीनुसार, भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने मंत्री असलेल्या आणि राज्यसभेत खासदार असलेल्या नेत्यांना निवडणुकांसाठी लोकसभेच्या जागा शोधण्यास सांगितले आहे. यात महाराष्ट्रातील नारायण राणे, पियुष गोयल यांच्यापासून ते अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा समावेश आहे. मात्र, कोणत्या जागेवरून कोणाला उमेदवारी द्यायची, निवडणूक लढवायची की नाही, याचा अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेणार आहे.
या यादीत केंद्रीय मंत्री कोण आहेत आणि ते कोठून निवडणूक लढवू शकतात?
1. अर्थमंत्री निर्मला सीतारामन – तामिळनाडू
2. परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – तामिळनाडू
3. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री -पीयूष गोयल – महाराष्ट्र
4. शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान – ओरिसा
5. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे – महाराष्ट्र
6. आयुष, बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल – आसाम
7. नागरी विमान वाहतूक, पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया – मध्यप्रदेश
8. रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव – ओडिशा
9. पेट्रोलियम, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी – पंजाब किंवा जम्मू-काश्मीर
10. आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने मंत्री मनसुख मांडविया – गुजरात
11. पर्यावरण आणि कामगार भूपेंद्र यादव – हरियाणा किंवा राजस्थान
12. मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय परशोत्तम रुपाला – गुजरात