Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!
Happy Birthday Disha Patani: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने (Disha Patani) फिल्मी दुनियेमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. अनेक सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी दिशा आज (१३ जून) तिचा ३०वा वाढदिवस जोरदार साजरा करत आहे. (Happy Birthday Disha Patani) दिशा पाटनी मूळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची आहे. (Disha Patani life) उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती मुंबईमध्ये आली होती.
View this post on Instagram
परंतु दिशा मुंबईमध्ये अभिनेत्री बनण्यासाठी आली नव्हती. तर तिला पायलट व्हायचं होतं. पण, ओघाओघाने ती अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा विचार केला. दिशा पाटनीचे वडील हे एक पोलीस अधिकारी आहेत आणि तिची बहीण सैन्यामध्ये आहे. तर दिशाने देखील कायम पायलट होण्याचे स्वप्न बघितले होते. लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये बायोटेक शिकण्याबरोरबरच तिने मॉडेलिंग करण्यास देखील सुरुवात केली होती. त्यावेळी दिशा केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईमध्ये आली होती.
ती मुंबईत एका स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर तिला ऑडिशनसाठी कॉल येण्यास सुरुवात झाली. यामुळे दिशा पाटनीने मनोरंजन क्षेत्र निवडलं आणि अभिनेत्री होण्याच्या दिशेने तिची वाटचाल सुरु झाली. दिशा पाटनीने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाद्वारे हिंदी सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिशा पाटनी ही करोडोंची मालकीण आहे. दिशा दरवर्षी जवळपास १२ कोटी रुपये कमवत असल्याची माहिती समोर आली आहे. दिशाची एकूण संपत्ती ७४ कोटींच्या इतकी आहे.
Kajol कडून आयुष्यातील नैराश्याचा उलगडा; म्हणाली हा तर ‘द ट्रायल…’
दिशा एका सिनेमासाठी ६ कोटी रुपये आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी १ कोटी रुपये मानधन घेत असते. करिअर घडवायला मुंबईमध्ये आलेली दिशा पाटनीने एक आलिशान घर देखील विकत घेतले आहे. परंतु तिच्या या घरामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, त्याची किंमत सुमारे ५ कोटी जवळपास आहे. दिशा अनेकवेळा तिच्या घराचे सुंदर फोटो शेअर करत असते.
कधी- कधी अभिनेत्री बाल्कनीमध्ये उभा राहून देखील फोटो शेअर करते, तर कधी ती होम जिममध्ये वर्कआउट करत असल्याचे देखील दिसून येत असते. दिशा पाटनीला महागड्या आणि आलिशान गाड्यांची देखील खूप आवड आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये मिनी कूपर, मर्सिडीज बेंझ, ऑडी अशा अनेक महागड्या गाड्या आहेत. दिशा स्वतः अनेकदा मर्सिडीज आणि ऑडी चालवत असल्याचे दिसून येत असते.