Download App

नितीशकुमारांशी आमचे चांगले संबंध, ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात; आठवलेंचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

Ramdas Athawale On Nitishkumar : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) शनिवारी (29 जुलै) पाटणाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांच्याबद्दल मोठं विधान केलं. नितीशकुमार यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. ते आमच्यासोबत आहेत आहेत, अन् कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांनी पुन्हा एनडीएमध्ये (NDA) यावं, तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असे आवाहनही आठवले यांनी केलं. (Ramdas Athawale On Nitishkumar We have good relations with Nitish Kumar, they can come with us anytime)

रामदास आठवले सध्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नितीशकुमार यांच्याविषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. ते आमच्यासोबत आहेत आणि कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. एनडीएसोबत राहून त्यांनी आपल्या कारकिर्दीत बिहारचा खूप विकास केला आहे. त्यामुळं आता त्यांनी एनडीएत वापस यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, असं आठवले म्हणाले.

ते म्हणाले, राहुल गांधींकडून युतीचे नाव इंडिया असे ठेवले तेव्हा नितीशकुमार खूश नव्हते, अशा परिस्थितीत त्यांनी पुन्हा मुंबईतील बैठकीला जाऊ नये, असं आवाहनही आठवलेंनी केलं.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा बॉक्स ऑफिसवर जलवा; दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई 

आठवले म्हणाले, जेव्हा ते अटलजींच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते. तेव्हाही माझे त्याच्याशी चांगले संबंध होते. आताही नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध असल्याचं सांगत त्यांच्या कामाचे कौतुकही केलं. नितीशकुमार यांच्या राजदसोबत जाण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आठवले म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी चांगले संबंध असूनही नितीश कुमार यांची जनता दल (यू) मधून बाहेर पडणे ही खेदाची बाब आहे. नितीशकुमार यांनी एनडीएमध्ये यावं, असं मला वाटतं. मात्र, नितीशकुमार आणि भाजपला याबाबत निर्णय घ्यायचा आहे, असं आठवले म्हणाले.

महाराष्ट्रात ज्याप्रकारे बदल झाला आहे,सर्वजण त्यांचे पक्ष सोडून आमच्यासोबत येत आहेत. तसाच बदल बिहारमध्येही व्हायला हवा, असंही आठवले म्हणाले.

दरम्यान, भाजपने आठवलेंच्या या विधानाला विरोध केला आहे. बिहारमधील भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बच्चौल यांनी याला हे रामदास आठवले यांचे वैयक्तिक विचार असल्याचे म्हटलं. ते म्हणाले की, नितीश यांच्यासाठी भाजपचा मार्ग बंद झाला आहे. तर दुसरीकडे जेडीयूचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी सांगितले की, नितीशकुमार यांचे राजकारण विचारसरणीवर आधारित आहेत. आठवले नितीशकुमारांच्या कामाचे कौतुक करत आहेत. मग आता त्यांनीचे एनडीए सोडून विरोधी आघाडीत सहभागी व्हावे, असं आवाहन केलं.

Tags

follow us