Download App

‘मोदी जानते हैं जनता की नाड़ी, तभी मैंने बढ़ाई दाढ़ी..,’ रामदास आठवलेंची कविता ऐकताच शाह हसले…

Ramdas Athavale : राज्यसभेत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले उभे राहिले आणि त्यांनी कवित म्हटले नाहीत असं कधीच होत नाही. अशातच राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा सुरु असताना रामदास आठवलेंनी गंमतीदार कविता म्हणून दाखवली आहे. आठवलेंनी कविता म्हणताच सभागृहातील सदस्यांसह केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही हसू आवरलं नसल्याचं चित्र दिसून आलं आहे.

जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर; कारण ही सांगितले…

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु होती. अशातच रामदास आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले, “अमित भाई का इतना अच्छा आ गया है बिल| सामने वालों को हो रहा है फील! नरेंद्र मोदी के पास है इतनी अच्छी विल| दिल्ली में हो रही है शराब की डील| नरेंद्र मोदी और अमित शाह की बहुत अच्छी बन गई जोड़ी| फिर कांग्रेस और आप वालों की कैसे आगे जाएगी गाड़ी! नरेंद्र मोदी जानते हैं जनता की नाड़ी| इसीलिए तो मैंने बढ़ाई है दाढ़ी।” आठवलेंनी ही कविता सादर करताच सभागृहात एकच हशा पिकला होता.

‘ते’ दहशतवादी ‘इसिस’ अन् ‘अल सुफा’शी संबंधित; एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा…

लोकसभेनंतर आता राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय. या विधेयकाला 131 खासदारांनी पाठिंबा दिला असून 102 खासदारांनी विरोध दर्शवला होता. अधिवेशनात प्रचंड गोंधळानंतर राज्यसभेत हे विधेयक पारित करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधी पक्ष इंडिया आघाडीसाठी आज राज्यसभेत दिल्ली सेवा बिलाविरोधात मतदान करणं गरजेचं होतं. अखेर देशातल्या विरोधी पक्षांच्या सर्वच खासदारांनी आपली एकजूट दाखवून दिली आहे. दिल्ली सेवा बिलाला 102 खासदारांनी विरोध दर्शवला आहे. या विधेयकानूसार आता दिल्लीच्या अखत्यारीत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारी नायब राज्यपालांकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, कार्यक्रम कोणताही असो तिथे रामदास आठवले यांच्या भाषणात कविता ही ठरलेलीचं असतेचं. आठवले कवितेतून विरोधकांवर टोलेबाजी करीत असतात हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे दिल्ली विधेयकाच्या चर्चेदरम्यान आजही आठवलेंनी विरोधकांवर कवितेतून टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळाले आहेत.

Tags

follow us